भेटा ‘झुंड’ चित्रपटातील खऱ्या ‘विजय’ सरांना; याच व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे चित्रपट

भेटा ‘झुंड’ चित्रपटातील खऱ्या ‘विजय’ सरांना; याच व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे चित्रपट

नागराज मंजुळे यांचा झुंड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आता बऱ्यापैकी कमाई देखील केली आहे. मात्र एकीकडे हा चित्रपट गाजत असतानाच या चित्रपटावर टीकादेखील होताना दिसत आहे.

त्याचे कारण म्हणजे नागराज मंजुळे हे वंचित घटकासाठी चित्रपट बनवतात तर असे असताना त्यांनी अमिताभ बच्चन यांना या चित्रपटात का घेतले अशी विचारणा देखील होत आहे. झुंड हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. नागपूरच्या एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. हे अनेक लोकांना माहिती नाही.

काही वर्षापूर्वी विजय बारसे यांनी झोपडपट्टीतील मुलांसाठी फुटबॉल प्रशिक्षण दिले होते. त्यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असून अमिताभ बच्चन यांनी प्रशिक्षकाची भूमिका या चित्रपटात साकारली आहे. झुंड चित्रपटात आपल्याला आकाश ठोसर हा देखील दिसला आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरु हिनेदेखील भूमिका साकारली आहे.

त्याचप्रमाणे या चित्रपटामध्ये किशोर कदम यांनी देखील अप्रतिम असे काम केले आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे संगीत लाभले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना आता दिसत आहेत. मात्र, बारसे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. त्यांच्याविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही. या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हीच माहिती सांगणार आहोत.

नागराज मंजुळे यांनी झुंड चिञपटातून विजय बारसे यांचे झोपडपट्टीतील मुलांसाठी केलेले महान कार्य जगा समोर आणले. विजय बारसे हे नागपूरच्या एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलची ट्रेनिंग देऊन त्यांना खेळाडू बनवले होते. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.

तसेच त्यांनी ‘स्लम सॉकर’ नावाच्या लीगचीही स्थापना केली. आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात विजय बारसे यांची प्रेरणादायी कथा दाखवण्यात आली होती. त्यावेळेस देखील त्यांचे खूप कौतुक करण्यात आले होते. विजय बारसे हे २००० सालच्या दरम्यान ते नागपूरमधील हिसलॉप कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करत होते.

त्यावेळी त्यांना काही मुले पावसात तुटलेल्या बादलीला पायाने लाथ मारताना, त्याभोवती खेळताना दिसली होती. त्यानंतर त्यांनी त्या मुलांना फुटबॉल दिला. तेव्हा त्या मुलांनीही ते आनंदाने स्वीकारले होते. विजय बारसे यांनी त्यांच्या या कार्याच्या माध्यमातून पुढे २००२ साली ‘झोपडपट्टी फुटबॉल लीग’ची सुरुवात केली. कालांतराने हाच खेळ ‘स्लम सॉसर’च्या नावाने प्रसिद्ध झाला होता.

यादरम्यान काही लोकांनी त्यांना विचारले होते की, त्यांनी लीगचे नाव झोपडपट्टी फुटबॉल असे का ठेवलं? तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘मला माहित आहे की, ही सर्व मुले झोपडपट्टीतून आलेले आहेत. मला त्यांच्यासाठीच काम करायचे आहे. म्हणून मी हे नाव ठेवले आहे. विजय बारसे यांनी स्लम साँसर जागतिक पातळीवर नेले.

यामुळे समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तींना योग्य वळण देवून भारत देशाचे नाव जगात उंचावण्याचे महान कार्य विजय बारसे यांनी केलेले आहे. याच पार्श्वभूमीवर नागराज मंजुळे यांनी चित्रपटांमध्ये याचे चित्रण केले आहे.

Team Beauty Of Maharashtra