‘झुंड’ चित्रपटानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे सापडले संकटात, या कारणामुळे होतीये कडकडून टीका !!

झुंड या चित्रपटाची चर्चा सध्या मराठीसह बॉलिवुडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रंगत आहे. कारण की हिंदी मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे नागराज पोपटराव मंजुळे यांनी केले आहे.
नागराज मंजुळे यांनी याआधी अनेक चित्रपटांची निर्मिती दिग्दर्शन केले आहे. यामध्ये आपल्याला सैराट सारखा चित्रपटाची उदाहरण घेता येईल. सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदाच शंभर कोटीचा गल्ला केला होता. शंभर कोटींचा व्यवसाय करणारा मराठीतील एकमेव चित्रपट समजल्या जातो. त्यानंतर या चित्रपटाची हिंदी मध्ये देखील निर्मिती करण्यात आली होती.
नागराज मंजुळे यांनी अतिशय खडतर आयुष्य जगून चित्रपटसृष्टीमध्ये आपले करियर केले आहे. त्यामुळेच त्यांचा गौरव अनेक जण करत असतात. नागराज मंजुळे सध्या यांच्यावर अनेक जण टीका टिप्पणी करताना देखील दिसत आहेत.
झुंड चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडिया सध्या नागराज मंजुळे यांच्या विषयी चर्चा रंगताना दिसताहेत. झुंड चित्रपटामध्ये एका सीन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत अमिताभ बच्चन हा अभिवादन करताना दिसत आहेत. त्यामुळे अनेकांनी या चित्रपटाला उचलून धरले आहे, तर नागराज मंजुळे हे केवळ वंचित घटकाचे चित्रपट बनवत असतात, असे अनेकांनी म्हटले आहे.
तर नागराज मंजुळे यांच्या समर्थनामध्ये मराठी चित्रपट सृष्टी मधील अनेक कलाकार समोर आले आहेत. नागराज मंजुळे यांचा पिस्तुल्या हा हा लघुपट प्रचंड चालला होता. या लघुपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले. त्यानंतर त्यांचा सैराट चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला. यात परश्या आणि आर्ची प्रेम कहाणी दाखवण्यात आली होती.
एक उच्चवर्णीय मुलगी आणि खालच्या जातीचा मुलगा अशी या चित्रपटाची कथा होती. ऑनर किलिंग वर हा चित्रपट दाखवण्यात आला होता. आतादेखील नागराज मंजुळे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे एका निर्मात्याने नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका टाकलेली आहे. हैदराबाद येथील चित्रपट निर्माते नंदिनी कुमार यांना तेलंगणा उच्च न्यायालयाने नुकताच दहा लाख रुपयांचा दंड लावला.
याचे कारणही स्पष्ट झाले आहे. तसेच हा दंड पंतप्रधान आपात निधी मध्ये भरण्याचे देखील सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे 30 दिवसाच्या आत ही रक्कम भरण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. नंदिनी कुमार यांनी फुटबॉलपटू अखीलेश पॉल यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे मालकी हक्क खरेदी केले होतो.
2018 साली कुमार यांना समजले की अखिलेश कालच्या टीमला प्रशिक्षण देणारे विजय बारसे यांच्यावर एक चित्रपट येत आहे. त्यावेळेस त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळेस हे प्रकरण खऱ्या अर्थाने कोर्टात गेले असे म्हणावे लागेल. त्यांनी या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हा दंड ठोठावला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
तर दुसरीकडे झुंड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.