‘झपाटलेला’ चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेसोबत दिसलेली आवडी आठवते का? आता दिसते अशी

लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यातून जाऊन जवळपास अनेक वर्ष झाले आहेत. मात्र, असे असले तरी लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण अनेकांना येत असते. कारण की लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविना मराठी चित्रपटसृष्टी ही अधुरीच आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आजवर अनेक चित्रपटात काम केले होते. तसेच त्यांनी काही नाटकांमध्ये देखील काम केले होते.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केलेले झपाटलेला, माझा छकुला, विदूषक, चिकट नवरा, उतावळा नवरा यासारखे चित्रपट केले. त्यांचे हे चित्रपट प्रचंड गाजले होते. मात्र, याहूनही अधिक त्यांचा “अशी ही बनवा बनवी” हा चित्रपट प्रचंड चालला होता. या चित्रपटात अनेक कलाकार होते. असे असले तरी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या भूमिकेचे कौतुक अनेकांनी त्यांनी केले होते.
“अशी ही बनवाबनवी” या चित्रपटांमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगावकर, अश्विनी भावे यासारखे कलाकार दिसले होते. हा चित्रपट जवळपास पंचवीस वर्षापूर्वी आला होता. तरी देखील या चित्रपटाची क्रेज अजूनही कमी झाली नाही.
हा चित्रपट लागला की, अजूनही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात पहिला जातो. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी महेश कोठारे यांच्या सोबत अनेक चित्रपटात काम केले होते. महेश कोठारे यांच्या सोबत त्यांनी सगळ्यात शेवटचा “पछाडलेला” हा चित्रपट केला होता. अगदी त्यांना आजारपण होते.
मात्र, असे असले तरी ते या चित्रपटाच्या शेवटपर्यंत काम करत राहिले आणि हा चित्रपट झाल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यामधून हे जग सोडून गेले. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया बेर्डे यांच्यासोबत त्यानंतर लग्न केले होते. प्रिया बेर्डे यांना अभिनय आणि स्वानंदी बेर्डे ही मुले आहेत. दोन्ही मुले आज अनेक क्षेत्रांमध्ये काम करत आहेत.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत झपाटलेला या चित्रपटामध्ये एक तरुणी दिसते. या मुलीचे नाव चित्रपटांमध्ये आवडी असे होते. ही भूमिका अभिनेत्री पूजा पवार हिने साकारली होती. त्यानंतर पूजा पवार हिने विदूषक, चिकट नवरा, या सारख्या चित्रपटात काम केले. मात्र, कालांतराने चित्रपट सृष्टीतुन ती गायब झाली आणि आता ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते.
सोशल मीडियावर ती आपले फोटो देखील अपलोड करत असते. या फोटोला देखील तिचे चाहते लाईक आणि शेअर करत असतात. पवार हिची मुलगी आलिशा साळुंखे ही देखील अभिनय क्षेत्रात येण्यासाठी सरसावली आहे. आता ती जाहिरातीमध्ये सध्या अजून मधून दिसत असते. मात्र, तिला नाटक यामधूनच पदार्पण करायचे आहे, असे तिने सांगितले.