येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील ओम ने दिली वाईट बातमी !

येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील ओम ने दिली वाईट बातमी !

“येऊ कशी तशी मी नांदायला” मालिकेत आता ओम हा आपल्या लवकरच नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत आम्ही आपल्याला या लेखांमध्ये माहिती देणार आहोत. नुकत्याच झालेल्या भागामध्ये आपण पाहिले की ओम हा स्वीटू हिला रस्त्यावर दिसतो.

त्या वेळेस स्वीटू ही त्याच्याकडे पळत पळत जाते आणि त्याला विचारते की, तू इतके दिवस कुठे होतास. असा जाब विचारते. त्यावेळेस ओम म्हणतो की, मी बेंगलोर ला गेलो होतो. त्यावर स्वीट म्हणते की, बेंगलोरला खूप थंडी असते. तू का बर तिकडे गेला होतास?. त्यावेळेस तिथे रॉकी देखील असतो. ही बातमी नंतर शकू मावशी यांना देखील कळते.

त्यामुळे शकू मावशी यांना आता आनंद वाटतो की, आता ओम परत आलेला आहे. त्यानंतर स्वीट आणि ओम हे बोलत असतात त्याच वेळेस त्याला लक्षात येते की तिचे लग्न झाले आहे. त्यानंतर ओम तिला म्हणतो की, तु आता माझी नाहीस. तू मोहितची आहेस.

आपल्यासोबत खूप आठवणी आहेत. पुढील जन्मी आपण नक्की एकत्र येऊ, असे तो तिला म्हणतो. त्याच वेळेस ती रडू लागते. त्यानंतर तेथे उपस्थित असलेला रॉकी या दोघांनाही सांभाळून घेतो. तर तिकडे नलू मावशी यादेखील सांगतात की, ओम आणि स्वीटू आता एकत्र येऊ शकत नाही.

कारण स्वीटू आणि मोहित यांचे लग्न झालेले आहे. या मालिकेमध्ये शुभांगी गोखले या देखील दिसलेल्या आहेत. शुभांगी गोखले यांनी अतिशय अप्रतिम असे काम या मालिकेत केलेले आहे. तर ओम म्हणजेच ओमकार च्या भूमिकेमध्ये शाल्व हा दिसला आहे. शाल्व हा सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो.

आपल्या चाहत्यांना तो या माध्यमातून अनेक बातम्या आणि फोटो देखील शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वीच शाल्व याने एक बातमी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केली आहे. यावर तो म्हणतो की, मला ग्रे रंग खूप आवडतो. मला काही माहित नाही. मात्र, ग्रे शेड मला फारच आवडतो. बिहाइंड द सीन त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

एखादा व्यक्ती चांगला असेल आणि तो अचानकपणे वाईट वागू लागला, तर आपल्याला कसे वाटेल, असे म्हणून त्याने ही कमेंट टाकलेली आहे. त्यामुळे आता येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेमध्ये ओम म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर हा आता लवकरच नकारात्मक भूमिकेमध्ये दिसणार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे ओम आणि स्वीटू यांचे पुढे काय होते हेदेखील पाहणे आता मजेशीर ठरणार आहे.

Team Beauty Of Maharashtra