‘येऊ कशी तशी मी नांदायला’चा महाएपिसोड पाहून प्रेक्षक भडकले, जाणून घ्या त्यामागचे कारण

‘येऊ कशी तशी मी नांदायला’चा महाएपिसोड पाहून प्रेक्षक भडकले, जाणून घ्या त्यामागचे कारण

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ अत्यंत अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. सोबतच मागचा पुढचा कसलाही संदर्भ नसताना निव्वळ मालिका वाढवायची म्हणून दाखवण्यात येणाऱ्या कथेमुळे वेळोवेळी मालिकेला प्रेक्षकांनी ट्रोल केलं.

परंतु, आता मालिकेत दाखवल्या गेलेल्या कथेमुळे प्रेक्षकांचा संताप झाला आहे. मालिकेत दाखवलेल्या स्वीटू आणि मोहितच्या लग्नामुळे प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर मालिकेला पुन्हा एकदा ट्रोल केलं जातंय.मालिकेत सध्या स्वीटू आणि ओमच्या लग्नाचं कथानक सुरू आहे. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर ओमने नलू मावशीचं मन जिंकलं आणि अखेर नलूने ओम आणि स्वीटूच्या लग्नाला होकार दिला.

ओम आणि स्वीटूच्या लग्नाचा दोन तासांचा महाएपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले होते. परंतु, त्यावेळेसही त्यांच्या पदरी निराशाच पडल्याने प्रेक्षकांनी वाहिनीवर आणि मालिकेच्या लेखकांवर संताप व्यक्त केला आहे. स्वीटूचं लग्न ओमसोबत न होता मोहितसोबत होतं. त्यातही नवरदेव कुठे आहे याचा कुणालाही थांगपत्ता नसतो.

तर मोहित स्वीटूसोबत लग्नासाठी तात्काळ होकार देतो. हे सगळं पाहून मालिकेला प्रचंड ट्रोल केलं जातंय.काही युझर्सनी प्रतिक्रिया देत लिहिलं, ‘कोणती नशा करून तुम्ही मालिका लिहिता?’ तर आणखी एका युझरने लिहिलं, ‘हा निव्वळ फालतूपणा दाखवला गेला आहे. प्रेक्षकांना मूर्ख समजून काहीही दाखवतायत.

‘दुसऱ्या युझरने लिहिलं, ‘मालिका वाढवायची म्हणून काहीही दाखवायचं. त्यापेक्षा मालिका बंद करा.’ अशा अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत. तर दुसरीकडे मालिकेच्या या भागावर अनेक मिम्सदेखील वायरल होत आहेत.

Team Beauty Of Maharashtra