‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील नलू मावशीच्या पतीला पाहिल आहे का ?

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील नलू मावशीच्या पतीला पाहिल आहे का ?

सध्या छोट्या पडद्यावर “येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडतात. या मालिकेमध्ये मालविका ही भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडते. ही भूमिका आदिती सारंगधर या अभिनेत्रीने साकारली आहे.

या आधी देखील आदिती सारंगधर हिने अनेक मालिका व चित्रपटात देखील काम केले आहे. तिने “सावरखेड एक गाव” या चित्रपटात काही वर्षांपूर्वी काम केले होते. हा चित्रपट खूप गजला होता. त्यानंतर तिने वादळवाट या मालिकेतही काम केले होते. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील ओम आणि स्वीटू यांची प्रेमकहाणी खऱ्या अर्थाने दाखवण्यात आलेली आहे.

मात्र, आता या मालिकेत टिव्स्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेमध्ये शुभांगी गोखले यांनी देखील अतिशय दर्जेदार असे काम केलेले आहे. तरी या मालिकेमध्ये रॉकी हे पात्र देखील प्रेक्षकांना खूप आवडते. मात्र मालिकेमध्ये आता स्वीटू आणि मोहित यांचे लग्न झाल्याचे दाखवण्यात आले आहे.

त्यामुळे आता आणि स्वीटू यांचे काय होणार, असा प्रश्न देखील चाहत्यांना पडलेला आहे. गेल्या काही भागांमध्ये ओम हा स्वीटूच्या घरी जातो आणि त्यांच्या घरच्यांसाठी खूप काही सामान घेऊन जातो. त्यावेळेस चिन्या देखील तिथे येतो आणि ओम याने काय आणलेले आहे ते उत्सुकतेने पाहतो. ओम हा दादांसाठी चांगले पुस्तक वाचायला घेऊन येतो.

त्याचप्रमाणे सुमन काकी यांच्यासाठी देखील खूप सामान आणतो. हे पाहून सगळेजण घरातील खुश होतात. मात्र, तेवढ्यात तिथे स्वीटू आल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, आपल्या आधी ओम घरी आलेला आहे, हे पाहून स्वीटू तिने आणलेल्या पिशव्या बाहेरच ठेवते आणि मी सहजच तुम्हाला भेटायला आले, असे सांगते आणि मग ओम बाहेर थांबतो.

मग तिथे चिन्या येतो आणि त्याला म्हणतो, अरे बाहेर का थांबलेला आहे. मध्ये चल, त्यावर ओम त्याला म्हणतो की, नको स्वीटू आतमध्ये आहे. तिला माझ्यासमोर बोलायला खूप अवघड वाटेल. त्यामुळे मी आता मध्ये जाणे योग्य नाही. त्यामुळे ओम अजूनही स्वीटूचा विचार करत असल्याचे दिसत आहे.

या मालिकेमध्ये नलू मावशी हे पात्र देखील प्रचंड गाजले आहे. नलू मावशी ही भूमिका अभिनेत्री दीप्ती केरकर् हिने साकारली आहे. दीप्ती हिचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले असून तिच्या पतीचे नाव रोनित केरकर असे आहे. सोशल मीडियावर केवळ दिप्ती आणि रोनित याचा एकच फोटो आहे

रोनित गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत नोकरी करत असल्याचे सांगण्यात येते आणि तो इंजिनियर आहे, असे देखील सांगण्यात येते. मात्र दीप्ती केरकर हिने याबाबत अधिक माहिती दिली नाही.

Team Beauty Of Maharashtra