बापरे ! ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील नेहा‌ म्हणाली यश बद्दल हे काय बोलून गेली…

बापरे ! ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील नेहा‌ म्हणाली यश बद्दल हे काय बोलून गेली…

झी मराठी या वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात कमी वेळात स्थान निर्माण केले असून या मालिकेने आता नवीन वळण घेतले आहे. या मालिकेत आपण गेल्या काही भागांपासून पहात आहोत की, वहिनी ही सातत्याने नेहाने दुसरे लग्न करावे, यासाठी प्रयत्न करत असतो त्यात ती यशस्वी होते.

बंडू काका व काकूंचे मत देखील असेच असते. यासाठी बंडू काका आणि काकू सोबत बोलतात. यशला बंडू काका आणि काकू परांजपे सोबत नेहाने लग्न करावे, असे म्हणतात. यश परीची समजूत घालतो आणि परी लग्नास होकार देते. परांजपेचा नेहाशी लग्न करण्या मागे डाव असतो. तो डाव लग्न मंडपात यश सर्वांसमोर उघडा पाडतो.

नेहा सोबत तिचे घर मिळवण्यासाठी परांजपे लग्न करण्यास तयार असतो. यश हे सर्व नेहा समोर सत्य उघडकीस आणतो. पुन्हा एकदा नेहा या धक्क्यातून सावरेल का? हा प्रेक्षकांसमोर पडलेला प्रश्न आहे. परी ला देखील वाईट वाटते. परी काकू ला म्हणते की, माझ्यामुळे आईचं लग्न मोडल आहे. मी फ्रेंड ला मेसेज केला.

त्यामुळे हे सर्व घडले आहे. तर काकू म्हणते की, बाळा तुझे काही चुकले नाही .तू मेसेज केल्यामुळे हे सर्व सत्य बाहेर आले. त्यानंतर नेहा रडत असते. तेव्हा काका व काकू तिला समजावून सांगतात. काका म्हणतात की, परमेश्वराच्या कृपेने हा मोठा अनर्थ टळला आहे. तू रडू नकोस.

काही गोष्टी घडण्याआधी आपल्या समोर परमेश्वराने आणल्या आहेत. त्यामुळे जे झाले ते चांगले झाले. इतक्यात यश परांजपे ला नेहा समोर आणतो. परांजपे नेहाची माफी मागतो आणि तो परीला कुठेतरी लांब नेऊन सोडणार असतो आणि नेहाला घरातून हाकलून देऊन तिचे घर स्वतः च्या नावावर करून घेणारा असतो.

हे सर्व कबूल करतो. यानंतर पोलिस त्याला घेऊन जातात. यश नेहाची माफी मागतो. माझ्यामुळे हे सर्व झाले आहे. माझी इच्छा होती की, परी ला तुला आधार मिळावा, म्हणून मी लग्न कर म्हणलो होतो. माझे चुकले, मला माफ कर असं म्हणतो.

नुकताच नेहाने म्हणजे प्रार्थना बेहेरे ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणते की, मी प्रेक्षकांचे आभार मानते. यामागील कारण ही तसंच आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने 100 भाग पूर्ण केले आहेत. हे सर्व प्रेक्षकांमुळे शक्य झाले आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शंभर भाग पूर्ण झाली आहेत, असे नेहा म्हणते.

यानंतर नेहा म्हणते की, मला बरेच कमेंट्स येत आहेत की, तुम्ही यशसोबतच लग्न करा. तर येणाऱ्या काही भागांमध्ये आपण हे देखील पाहणार आहोत, की यश आणि नेहा चे लग्न होणार आहे. नेहा पुन्हा लग्नासाठी तयार होईल का? हा सर्वात मोठा प्रश्न असेल, असे ती म्हणते.

पुढील काही भाग तुम्हाला विशेष करून आवडतील, असे ती या व्हिडिओत प्रेक्षकांना म्हणताना दिसत आहे.

Team Beauty Of Maharashtra