कितीही जवळची व्यक्ती असली तरी, या वस्तू कधीच देऊ नये उधार

कितीही जवळची व्यक्ती असली तरी, या वस्तू कधीच देऊ नये उधार

हिंदू धर्मासोबतच वास्तुशास्त्रातही दानाला खूप महत्त्व दिले गेले आहे. काही गोष्टी दान केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते, तर काही गोष्टी दान केल्याने तुम्हाला धनहानी होऊ शकते. चला जाणून घेऊया अशाच काही गोष्टी ज्या चुकूनही कोणाला देऊ नयेत. ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत जर कोणी तांदूळ उसणे मागीतले आणि तुम्ही ते दिले तर तुमच्यावर शुक्राचा दोष येऊ शकतो. या दोषामुळे घरात भांडणे वाढू शकतात. यासोबतच घरात नकारात्मक ऊर्जाही वाढते.

कोणत्या कामामुळे शनिदेव होतात नाराज
मोहरीच्या तेलाचा थेट संबंध शनिदेवाशी आहे. म्हणूनच चुकूनही मोहरीचे तेल उसणे देऊ नका. दुसरीकडे, दूध चंद्राशी संबंधित मानले जाते. यासाठी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ कर्जावर देऊ नयेत. यामुळे तुमचा चंद्र दूषित होऊ शकतो. ज्याचे वाईट परिणाम तुम्हालाही भोगावे लागतात.

या कारणाने घरात राहत नाही बरकत
हळद हे देव गुरु बृहस्पतीशी संबंधित मानले जाते. अशा स्थितीत तुम्ही एखाद्याला हळद दान किंवा उधार दिल्यास गुरु दोष होऊ शकतो. दुसरीकडे, केतू ग्रहाचा संबंध लसूण-कांद्याशी मानला जातो. म्हणूनच शेजाऱ्याला लसूण-कांदा उसणे देऊ नका. नाहीतर घरात बरकत राहत नाही.

मीठ उसणे देऊ नये
अनेकदा शेजारी गरज पडेल तेव्हा मीठ मागायला येतात. पण वास्तुशास्त्रानुसार कधीच मीठ उसणे देणे टाळावे. असे केल्याने तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. याशीवाय मीठ उसणे मागणे हे दरिद्रीपणाचे लक्षण आहे.

Team BM