आपल्या घरातल्या देवघरात चुकूनही या मुर्त्या ठेवू नका, नाहीतर होतील असे परिणाम

हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की मनुष्याला मोक्षची प्राप्ती ही भगवंताच्या आशीर्वादामुळेच मिळू शकते. जर देवाची कृपा संपूर्ण घरात राहिली तर यापेक्षा चांगले काय असू शकते, म्हणूनच प्रत्येक घरात एक उपासनेसाठी देव घर स्थापित केले गेले जाते जेणेकरुन दररोज देवाची उपासना व त्यांना प्रसन्न करता येईल. परंतु पूजाघरात काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर त्या काही गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया …
काही मूर्ती घराच्या मंदिरात ठेवू नयेत. त्यांना ठेवल्यास घरात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी होतो.
सूर्यपुत्र शनिदेव यांची मूर्तीसुद्धा घराच्या मंदिरात ठेवू नये. जर तुम्ही शनिदेवाची पूजा करत असाल तर ते घराबाहेरच्या मंदिरात करा.
देवाची पाठ दर्शविणारी कोणतीही मूर्ती किंवा चित्र घरात ठेवू नये. हे अशुभ मानले जाते आणि यामुळे घरात राहणाऱ्या लोकांसाठी दुर्दैव येते.
देव घरात राक्षसाशी लढातांना किंवा राक्षसाला मारताना देव दर्शवितो अशी कोणतीही मूर्ती किंवा चित्र असू नये. हे देखील एक रौद्र रूप मानले जाते. त्याचे दर्शन केल्यास घरात संकट येते.
भंग झालेल्या मूर्ती किंवा फाटलेले देवाचे चित्र घरात ठेवू नये. हे वास्तु आणि ज्योतिष या दोन्ही अनुसार अशुभ आहेत.
देव घराय एकाच ठिकाणी एका देवाच्या दोन मूर्ती ठेवू नयेत. एकाच देवतेच्या दोन मूर्ती अजिबात ठेवू नयेत. जेव्हा हे घडते तेव्हा त्या घरात विवाद हा होतो.
भगवान शिव यांचा अवतार मानल्या जाणाऱ्या भैरव देवची मूर्ती घरात आणूच नये. भैरव हा भगवान शिवांचा अवतार मानला जातो परंतु भैरव देव तंत्र प्रकारातील देवता आहेत आणि घरात नव्हे तर घराबाहेर या देवाची उपासना करावी.
देवघरात देवाचे रौद्र रूप असणारी मूर्ती ठेवू नये. रुद्र अवताराची मूर्ती किंवा पेंटिंग लावल्यास घरात उग्र उर्जा निर्माण होते. घरांमध्ये, भगवंताच्या सौम्य स्वरूपाची चित्रे किंवा मूर्ती नेहमी स्थापित केल्या पाहिजेत.
राहू केतु – शनिदेवप्रमाणे राहू आणि केतूची मूर्ती घरात आणू नये. ज्योतिषानुसार शनि, राहू आणि केतु हे तीन पापी ग्रह आहेत. त्यांच्या मूर्ती घरात आणण्याने त्यांच्याशी संबंधित उर्जा देखील घरात आणतो.
नटराजची मूर्ती घरात ठेवु नये. नटराज हा भगवान शिवांचा उग्र स्वरुपाचा म्हणजे क्रोधित स्थितीचा अवतार आहे आणि अशी मूर्ती घरात आणल्यामुळे अशांतता पसरते.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.