या मालिकेच्या सेटवर राडा, सेटवर पोलीस दाखल

या मालिकेच्या सेटवर राडा, सेटवर पोलीस दाखल

बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. बाळूमामाच बालपण, त्यांचे चमत्कार भक्तगण त्यांची लिला हे सर्व काही बघताना प्रेक्षकांनी या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पाहताना अक्षरशः उचलून धरली.

या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता सुमित पुसावळे हा कुठेही गेला की लोक त्याच्या पाया पड्याचे. ही त्याच्या कामाची पोचपावती त्याला वाटते. याबाबत सुमित यांनी अनेकदा बोलून देखील दाखवले. सुमित पुसावळे काही दिवसापूर्वीच पश्चिम महाराष्ट्रात भरलेल्या बाळुमामाच्या यात्रेला देखील गेला होता.

या वेळेस त्यांनी पारंपारिक वेशभूषाचा पोशाख केला होता. त्यावेळेस त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. मात्र, या मालिकेमधील वाद उफाळून समोर आल्याचे दिसत आहे.

मालिकेमध्ये कलाकारांमधील हा वाद उफाळला नसला तरी मालिकेच्या निर्मात्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. नेमके प्रकरण काय झाले चला जाणून घेऊया.

प्रसिद्धी सोबत वाद हे ओघाने येतातच. त्यातही मालिका कलाकार वरील वागणुकीमुळे चर्चेत आले. सहकुटुंब सहपरिवार, आई माझी काळुबाई, मुलगी झाली हो या मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर आता बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका देखील वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

याचे कारण म्हणजे मालिकेच्या निर्मात्याला सेटवरच बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये त्यांचा पाय फॅक्चर झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. निर्मात्याला मारहाण झालेल्याचे नाव अलंकार भवरे असे आहे. शुल्लक गोष्टीवरून हा वाद विकोपाला गेला असल्याचे सांगण्यात येते.

सेटवर झोपण्याच्या कारणावरून हा वाद झाला. त्यानंतर अलंकार या निर्मात्याला बेदम मारहाण करून त्यांचा पाय तोडला. बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचे चित्रीकरण सध्या गोरगाव फिल्म सिटी मध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे भावरे यांच्या वर मारहाण करणाऱ्यांनी लोखंडी सळईने हल्ला चढवल्याचे सांगण्यात येते.

बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका गेल्या अनेक दिवसापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेमध्ये लहानपणापासून बाळूमामा यांनी वेगवेगळे चमत्कार दाखवून अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहे. तसेच लोकांच्या मदतीला धावून जाणारे बाळूमामा आहे.

एकूणच काय तर ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे आणि प्रेक्षकांना ती मालिका आवडत देखील आहे

Team Beauty Of Maharashtra