रक्षाबंधन विशेष : राखीपौर्णिमेला या देवांना जरूर बांधावी राखी..असा होतो शुभ लाभ

देवांना राखी बांधली गेली तर ते वर्षभर तुमच्या आनंदाचे आणि सन्मानाचे रक्षण करतात. त्याचबरोबर जीवनात येणारे त्रासही दूर करतात. रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या देवतांना कोणत्या रंगाचे रक्षासूत्र बांधावे हे आपण जाणून घेऊया…
राखी पौर्णिमेच्या दिवशी भावांबरोबर देवांना देखील राखी बांधण्याची जुनी परंपरा आहे. सनातन धर्मानुसार, जर रक्षाबंधनाच्या दिवशी देवांना राखी बांधली गेली तर ते वर्षभर तुमच्या आनंदाचे आणि सन्मानाचे रक्षण करतात. त्याचबरोबर जीवनात येणारे त्रासही दूर करतात. रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या देवतांना कोणत्या रंगाचे रक्षासूत्र बांधावे हे आपण जाणून घेऊया…
पहिला मान गणपतीला अशी राखी बांधा- सनातन धर्मात गणपतीला पहिला मान दिला जातो. म्हणून रक्षाबंधनाला सर्वप्रथम गणपतीला राखी बांधावी. परंतु गणपतीला फक्त लाल रंगाची राखी बांधली जाईल याची काळजी घ्या. असे म्हणतात की असे केल्याने जीवनातील सर्व ताण तणाव आणि समस्या संपतात. यासह, जीवनात सुख समृद्धी नांदते.
भोलेनाथांना राखी बांधायला विसरू नका– राखीचा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. म्हणून, या दिवशी भोलेनाथांना राखी बांधली पाहिजे. अशी मान्यता आहे की, या दिवशी निळ्या रंगाचे रक्षासूत्र भगवान शिव यांना बांधल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि घरात सुख-समृद्धीचा वास असतो.
कृष्णाला राखी बांधायला विसरू नका- पौराणिक मान्यतेनुसार, राखी बांधण्याची परंपरा द्रौपदीने कृष्णाला रक्षासूत्र बांधून केली. कृष्णाने द्रौपदीला आपली बहीण मानले आणि तिचे संरक्षण करण्याचे वचन दिले. पौराणिक कथेनुसार, चिरहरणाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने साडी चढवून द्रौपदीला मदत केली होती. असे म्हणतात की श्रीकृष्णाला हिरव्या रंगाची राखी बांधल्याने तो जीवनातील सर्व दुःख दूर करतो. कान्हा आपले अचानक होणाऱ्या त्रासांपासून रक्षण करतो.
समस्यानिवारक हनुमानाला देखील राखी बांधली पाहिजे– पवनसुत समस्यानिवारक हनुमानास देखील राखी बांधली पाहिजे. मानले जाते की पवनपुत्राला राखी बांधल्याने मंगल दोष दूर होतात. शक्ती आणि बुद्धिमत्ता प्राप्त होते. लाल रंग हनुमानजींना खूप प्रिय आहे, म्हणून त्यांना लाल रंग किंवा केशरी रंगाचे रक्षासूत्र बांधावे. यामुळे समस्यांचे त्वरीत निवारण होते.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.