या चार चुकांमूळे परिवाराला करावा लागतो संकटाचा सामना, होळीच्या आधी या गोष्टी अवश्य करा

या चार चुकांमूळे परिवाराला करावा लागतो संकटाचा सामना, होळीच्या आधी या गोष्टी अवश्य करा

होळीचा सण अवघ्या चार पाच दिवसांवर आला आहे. सनातन धर्मानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी (Holi 2023) साजरी केली जाते. भारतातील इतर सणांप्रमाणेच होळीचाही संबंध ऋतुबदल आणि स्वच्छतेशी आहे. होळी हिवाळ्याचे प्रस्थान आणि उन्हाळ्याचे आगमन दर्शवते. यासोबतच घराची सर्व स्वच्छताही होळीपूर्वी केली जाते. वास्तुशास्त्रानुसार होळीपूर्वी घरातून 4 गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत. हे केले नाही तर घराघरात गरिबी येण्यास वेळ लागत नाही. होलिका दहनाच्या आधी या सर्व वस्तू घराबाहेर टाकणे योग्य मानले जाते.

होळीपूर्वी या अशुभ गोष्टी घरातून काढून टाका
जाळे
वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की होळीपूर्वी घराची साफसफाई करताना जाळे स्वच्छ केले पाहिजेत. हे जाळे अस्वच्छतेचे लक्षण आहेत आणि घरात गरिबी आणतात. ज्या घरांमध्ये कोळ्याचे जाळे असतात तिथे माता लक्ष्मी कधीच येत नाही.

तुटलेले घड्याळ
घरात बंद किंवा तुटलेले घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते. हे तुटलेले घड्याळ म्हणजे वेळ थांबणे म्हणजे एखाद्याचा मृत्यू याच्याशी संबंध जोडला यातो. त्यामुळे घड्याळ तातडीने दुरुस्त करावे किंवा घराबाहेर काढून नवीन घड्याळ आणावे, अन्यथा आर्थिक समस्या सतावू लागतात.

फाटलेले जुने जोडे आणि चप्पल
होळीपूर्वी घरात ठेवलेले फाटलेले जुने बूट आणि चप्पल फेकून द्याव्या. या चप्पल गरिबीचे प्रतीक मानल्या जातात आणि सार्वजनिक ठिकाणी व्यक्तीचा आत्मसन्मानही कमी करतात. म्हणूनच त्यांना घराबाहेर टाकणे योग्य आहे.

देवी-देवतांच्या खंडित मूर्ती
घरातील देवतांच्या तुटलेल्या मूर्ती होळीपूर्वी काढल्या पाहिजेत होळी 2023 साठी वास्तु टिप्स. अशा मूर्ती घरात ठेवल्याने नकारात्मकता पसरू लागते, ज्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. या मूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे किंवा मातीत पुरावे.

Team BM