या मराठी अभिनेत्रीसोबत घडली ‘अतिशय’ वाईट घटना !

या मराठी अभिनेत्रीसोबत घडली ‘अतिशय’ वाईट घटना !

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या प्रकरणात एन सी बी चे समीर वानखेडे यांनी अनेकांना अटक केली. मात्र, शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर ते चर्चेत आले.

या प्रकरणात महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही उडी घेतली आणि त्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर त्यांनी आरोप करण्यास सुरुवात केली. त्यांनी पुरावे देखील दिले. समीर वानखेडे यांनी जी नोकरी मिळवली आहे ती बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे मिळवली आहे.

असे त्यांचा दावा होता. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट देखील केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी समीर यांचा निकाहनामा देखील सोशल मीडियावर पोस्ट करून ते मुस्लिम असल्याचे सांगितले आहे. माझी मुस्लिम धर्माची लढाई नाही, असे सांगत त्यांनी सत्य-असत्य विरोधात ही लढाई असल्याचे सांगितले.

त्यानंतर भाजपनेही या प्रकरणात उडी घेऊन नवाब मलिक यांच्यावर टीका करण्यास सुरू केली. समीर वानखेडे यांची जाहीरपणे बाजू घेतली. या प्रकरणात समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांचे नाव समोर आले आहे. यास्मिन वानखेडे हिने या प्रकरणात अनेक ठिकाणी लक्ष घातल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला नुकताच कोर्टाने जामीन देखील दिला आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांची दुसरी पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने देखील उडी घेतली आहे. क्रांती रेडकर हिने समीर यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे.

तसेच समीर वानखेडे यांची बाजू देखील जाहीरपणे मांडली आहे. समीर यांचा पहिला घटस्फोट झालेला आहे आणि त्याबाबतचे कागदपत्रे देखील आहेत, असे तिने सांगितले आहेत. क्रांती रेडकर ही मराठीतील दिग्गज अशी अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे.

क्रांती रेडकर हिने काही वर्षांपूर्वी “कोंबडी पळाली” या गाण्यामध्ये तिने भन्नाट नृत्य केले होते. त्यानंतर ती एकदम चर्चेत आली होती. क्रांती रेडकर म्हणाली, मला आणि माझ्या मुलाला थेट जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. काही दिवसापूर्वी क्रांती रेडकर आणि यास्मिन वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मोठा खुलासा केला आहे.

क्रांती रेडकर म्हणाली, मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे. पण मला आणि मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, हेही सत्य आहे. नवाब मलिक यांच्या आरोपांवर मला बोलण्याची काही गरज नाही. जर नवाब मलिक त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावे.

ट्विटरवर पोस्ट करून ते काय सिद्ध करू इच्छितात, असेही क्रांती रेडकर म्हणाली. मला आणि माझ्या मुलाला गेल्या काही दिवसापासून धमक्याही येत आहेत. मात्र, आम्ही कोणालाही घाबरत नाहीत, असेही ती म्हणाली.

Team Beauty Of Maharashtra