BBM3 : सोनाली पाटील नव्हे तर ही तरुणी आहे विशालची गर्लफ्रेंड..

BBM3 : सोनाली पाटील नव्हे तर ही तरुणी आहे विशालची गर्लफ्रेंड..

मराठी बिग बॉसचे तिसरे‌ पर्व कलर्स मराठी या वाहिनीवर सध्या धूम धडाक्यामध्ये सुरू आहे. दररोज या शोमध्ये वादाचे अनेक प्रसंग घडताना दिसत आहेत. या शोमध्ये सहभागी झालेले कलाकार हे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले आहेत. ते आपल्या क्षेत्रामध्ये माहीर असे आहेत.

मात्र, यंदाच्या शोमध्ये दोनशे स्पर्धक सहभागी झाले. त्यांनी सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतानाच समाजाप्रती आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मात्र, ते या शोमध्ये सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यातील एक म्हणजे शिवलीला बाळासाहेब पाटील ही होय. शिवलीला बाळासाहेब पाटील ही मूळ कीर्तनकार आहे.

ती बार्शी येथील रहिवासी आहे. वयाच्या पाचव्या वर्षी तिला घरातूनच कीर्तनाचा धडा मिळाला. वडील बाळासाहेब पाटील हे प्रख्यात कीर्तनकार आहेत. शिवलीला पाटील हिने वयाच्या दहाव्या वर्षी 1000 कीर्तन सांगून विक्रम नोंदवला होता. तिच्या या विक्रम मुळे तिला पुरस्कार देखील देण्यात आला.

तसेच दुसरी स्पर्धक म्हणजे भुमाता ब्रिगेडचे अध्यक्ष तृप्ती देसाई या होत. तृप्ती देसाई यांनी देखील अनेक आंदोलन करून समाजामध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला. महिलांविषयी त्यांचे आंदोलन हे प्रचंड गाजले आहेत. त्याचप्रमाणे या शो मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची या देखील सहभागी झाल्या आहेत.

त्याचप्रमाणे इतर स्पर्धक देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत. मिनल शहा हे एक नाव असे आहे की तिने देखील अनेक मालिका व चित्रपटातही काम केले आहे. याप्रमाणे देव माणूस मालिकेमध्ये झळकलेली आपल्याला सोनाली पाटील आठवत असेल. सोनाली पाटील हिने देव माणूस या मालिकेमध्ये अतिशय उत्कृष्ट असे काम केले होते.

तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली होती. ती देखील बिग बॉसमध्ये सहभागी झाली. मीरा जगन्नाथ हे एक नाव देखील अतिशय लोकप्रिय ठरलेले आहे. बिग बॉस च्या पहिल्या दिवसापासूनच मीरा जगन्नाथ ही सगळ्यांच्या नजरेत भरलेली आहे. कारण ती अनेक वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे.

बिग बॉस सूत्रधार महेश मांजरेकर यांनी देखील तिला समज दिली आहे. त्यानंतर तिला रडू देखील कोसळले होते. उत्कर्ष शिंदे हा देखील या शोमध्ये सहभागी झालेला आहे. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा तो मुलगा आहे. व्यवसायाने तो डॉक्टर असला तरी तो संगीत क्षेत्रामध्ये देखील कार्यरत आहे. या शोमध्ये विशाल निकम हा देखील तरुण सहभागी झालेला आहे.

विशाल हा मूळचा सांगलीचा रहिवासी आहे. त्याला या शोसाठी जवळपास पंधरा हजार रुपये मानधन देण्यात येते. या शोमध्ये सोनाली पाटील आणि विशाल निकम यांच्या मध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. सोनाली पाटील हिला एक टास्क आल्याने त्याने घट्ट मिठी मारली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे.

मात्र, मीनल शहासोबत बोलताना विशाल निकम याने सांगितले की, माझ्या आयुष्यामध्ये एक तरुणी आहे. तिने माझ्या आयुष्यामध्ये यावे असे मला मनोमन वाटत आहे. मात्र, आता हे कधी शक्य होईल, हे सांगता येत नाही. बिग बॉसच्या घरामध्ये येण्याच्या आधी आम्ही दोघं खूप बोललो देखील होतो, असेही विशाल निकम म्हणाला आहे. त्यामुळे त्याचे खरे प्रेम हे सोनाली नसून दुसरेच आहे हे देखील स्पष्ट झाले आहे.

Team Beauty Of Maharashtra