Viral व्हिडीओ मागचं सत्य : भर मंडपात नवरदेवाला इशारा करणारी ‘त्या’ मुलीबाबत झाला खुलासा

Viral व्हिडीओ मागचं सत्य : भर मंडपात नवरदेवाला इशारा करणारी ‘त्या’ मुलीबाबत झाला खुलासा

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ दररोज पोस्ट होत असतात. व्हायरल होत असतात. पण त्यातील काही मोजकेच व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका लग्नमंडपातील आहे. या मंडपात एक मुलगी नवरदेवाला इशारे करतना दिसत आहे. या व्हिडिओ मागचं सत्य समोर आलं आहे.

नवरदेव विजय मुणगेकर याची अंकिता प्रभू वालावलकर ही मैत्रिण आहे. लग्नावेळी थट्टा मस्करी सुरू असताना हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला. निव्वळ मस्करी आणि मजेशीर स्वरूपाचा हा व्हिडीओ अवघ्या काही दिवसांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. गेल्या आठवड्यात मुंबईत हा लग्न सोहळा पार पडला.

लग्नात अंकिता आपल्या मित्राला नवरदेव विजयला थट्टेत लग्न का करतोस? चल जाऊया… असा सवाल करत आहे. त्याला उत्तर देत विजय म्हणतो की,’आता काय करणार? जाऊ दे’ असा प्रतिसाद देतो. हाच संपूर्ण क्षण चित्रित झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. कधी कधी मस्करीची कुस्करी होती. अगदी तसंच काहीस या व्हिडीओत झालं आहे.

थट्टेत चित्रित केलेल्या या व्हिडिओमुळे नवरदेव विजय आणि वधु मयुरी सोशल मीडियावर चर्चेत आले. या व्हिडीओमुळे त्यांची थोडी अडचण होत आहे. मस्करीत केलेल्या या व्हिडिओमुळे काहीशा प्रमाणात त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टीची खातरजमा न करता व्हायरल झालेल्या गोष्टीचा मनस्तापच होतो.

हे यातून समोर आलं आहे. कोरोनाकाळात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अशावेळी अगदी मोजक्याच लोकांना लग्नाला उपस्थिती देण्यात आली आहे. म्हणजे अवघ्या 50 वऱ्हाड्यांमध्ये लग्न होत आहेत. अशावेळी एका लग्नातील भलताच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Team Beauty Of Maharastra