श्रावणात या वास्तुउपायांनी जीवनाचा खास आनंद घेऊ शकतात.. जाणून घ्या वास्तुटीप्स

श्रावणात या वास्तुउपायांनी जीवनाचा खास आनंद घेऊ शकतात.. जाणून घ्या वास्तुटीप्स

श्रावण महिना हा भगवान शिव यांच्या कृपेचा असतो. या महिन्यात भगवान शंकर प्रसन्न मुद्रेत असतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. श्रावणात अनेक व्रत वैकल्य केले जातात तसेच शिवकृपेसाठी अनेक उपाय केले जातात. या श्रावण महिन्यात वास्तूमध्ये हे सहज-सोपे उपाय केल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. जाणून घेऊया कोणते आहेत हे वास्तुउपाय…

या ठिकाणी पाण्याचा प्रवाह असू द्या- भगवान शंकराला पाणी खूप प्रिय आहे. हे लक्षात ठेऊन उत्तर दिशेला पाण्याचे कारंजे किंवा पाण्याचा प्रवाह असणे अतिशय शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सकारात्मक उर्जेचा वाहता प्रवाह असतो तसेच पैशांचा प्रवाह देखील वाढतो. उत्तर दिशेला शक्य नसल्यास पूर्व दिशेला देखील कृत्रिम पाण्याचे कारंजे ठेऊ शकता. हे बदल केल्यास महत्वाचे निर्णय घेणे सोपे जाते असे मानले जाते.

मनी प्लांट- श्रावण महिना हा पावसाचा असतो, तसेच मनी प्लांटच्या वाढीसाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो. श्रावण महिन्यात घराच्या उत्तर दिशेला मनी प्लांट लावून तुम्ही सुख-समृद्धी मिळवू शकता. घरात मनी प्लांट लावण्यासाठी श्रावण महिना चांगला असतो. जसजशी मनी प्लांटची वाढ होते तसतशी धनप्राप्तीत वाढ होते.

भगवान शंकराच्या मूर्तीची स्थापना- श्रावणात भगवान शंकराच्या अर्धनारीश्वर रुपाची पूजा करणे शुभ मानले जाते. या महिन्यात पूर्व दिशेला अर्धनारीश्वर रूप असलेल्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पूजा करणे शुभ मानले जाते. श्रावणात उत्तर दिशेला ही प्रतिमा लावल्याने विशेष लाभ मिळतो. त्यामुळे नवरा-बायकोमधील प्रेम वाढते आणि संततीची इच्छुक जोडप्यांची झोळी आनंदाने भरून जाते.

तुळशीच्या रोपाची लागवड करणे- घरात तुळशीचे झाड असणे सुख-सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. जर तुमच्या घरात तुळस नसेल तर श्रावणात तुळशीचे झाड लावू शकता. असे केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते. तुळशीचे रोप सुद्धा उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते. श्रावण महिन्यात कुमारिका म्हणजेच अविवाहित मुलींनी तुळशीचे रोप लावल्यास त्याच्या विवाहाचे योग निर्माण होतात.

गंगाजल- श्रावणात दररोज हे काम करा चारही बाजूंनी उर्जा निर्माण होते. अशावेळी घरातील प्रत्येक काना-कोपऱ्यात गंगाजल शिंपडणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील सर्व प्रकारचे वास्तू दोष नाहीसे होतात. त्यामुळे नकारात्मकता नाहीशी होते म्हणून नियमितपणे अंघोळ झाल्यावर घरात सगळीकडे गंगाजल शिंपडणे चांगले असते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra