वाजवा रे वाजवा! पण कुणी आणि कुणासाठी?; आज तुमच्या राशीत दडलंय काय?

वाजवा रे वाजवा! पण कुणी आणि कुणासाठी?; आज तुमच्या राशीत दडलंय काय?

रविवार (Sunday) म्हटला की प्रत्येकाला आपली रास (Rashi) जाणून घेण्याची तीव्र इच्छा होते. त्याचं कारण असं की वर्तमानपत्रं किंवा वृत्तवाहिन्यांवर रविवारचं भविष्य सांगितलं जातं अन् येणाऱ्या आठवड्याचंही भविष्य कथन केलं जातं.

रविवार (Sunday) म्हटला की प्रत्येकाला आपली रास (Rashi) जाणून घेण्याची तीव्र इच्छा होते. त्याचं कारण असं की वर्तमानपत्रं किंवा वृत्तवाहिन्यांवर रविवारचं भविष्य सांगितलं जातं अन् येणाऱ्या आठवड्याचंही भविष्य कथन केलं जातं. त्या आठवड्यात (Week) तुमच्या राशीत काय उलथापालथ होणार आहे? फायदा, नुकसान, नोकरी, नव्या संधी, व्यवसायातील यश अपयश, लग्नबिग्न, परदेशवारी आदींची माहिती या दिवशी दिली जाते.

त्यामुळे आपल्या राशीत आज काय दडलं असं प्रत्येकाला वाटत असतं. तसं वाटणंही स्वाभाविक आहे. याशिवाय आजचा सुट्टीचा दिवस कसा जाणार हे सुद्धा जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या नशीबात आज काय होणार हे सांगणार आहोत. आजच्या दिवशी सिंह राशीचे लोक आपल्या ग्राहकांशी दृढ संबंध ठेवतील. तर तुळ राशी असणाऱ्यांची आर्थिक स्थिती आज टकाटक असेल. नो कडकी, नो झंझट. त्यामुळे आजचा दिवस तुळ राशीवाल्यांसाठी बोले तो झक्कास असणार आहे.

मेष (Aries): मेष राशीच्या लोकांना आज एखादा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. पुरस्कार म्हणजे बक्षिस नाही मिळालं तरी आजचा दिवस त्यांच्यासाठी प्रगतीचा ठरणार आहे. तसेच विवाह सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांचा परदेशगमनाचा काही प्लानिंग असेल आणि काही कारणाने तो बारगळला असेल तर ते आज परदेशवारीचा प्लान करू शकतात.

वृषभ (Taurus): उद्योगी असलेले वृषभ राशीचे लोक आज एखादी महत्त्वाची योजना सुरू करू शकतात. वाडवडिलांच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणे निकाली निघतील. तुमच्या मनासारखाच निर्णय होईल. मात्र, उच्च शिक्षण किंवा परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्यांना थोडा वेट करावा लागेल.

मिथुन (Gemini): मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानसन्मानाचा असेल. आज तुम्हाला अचानक लाभ होऊ शकतो. तुमच्या मनातील आशा आकांक्षाही आज पूर्ण होऊ शकतात.

कर्क (Cancer): कलाप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. तसेच यश तुमच्या पायाशी लोळण घेईल.

सिंह (Leo): तुम्हाला तुमची पात्रता सिद्ध करण्याची भरपूर संधी मिळणार आहे. त्यामुळे संधीचं सोनं करा. उद्योग-व्यापार करणाऱ्यांनी ग्राहकांशी संबंध चांगले ठेवावेत. प्रकृतीकडे लक्ष द्यावे.

कन्या (Virgo): व्यवसायात काही बदल होण्याची शक्यता आहे. हितशत्रूंपासून धोका होऊ शकतो. त्यामुळे सांभाळून राहा. जीभेवर ताबा ठेवा. कुणाशीही बोलताना अदबीने बोला. अन्यथा अडचणीत याल.

तुळ (Libra): तुम्ही केलेली बचत आज तुमच्या उपयोगी पडणार आहे. तुमचे दोन्ही हात आज तुपात असतील. म्हणजे आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सकारात्मक राहा. संयम ठेवा.

वृश्चिक (Scorpio): सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या हातून आज सचेत कार्य घडेल. याशिवाय मोठी सामाजिक जबाबदारी तुमच्यावर येईल. थोडक्यात काय तर आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. लाभकारी असाच हा दिवस ठरेल.

धनु (Sagittarius): भगवान देता है तो छप्पड फाडके देता है… ही म्हण जणू काही तुमच्यासाठीच तयार केलीय असा हा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी तुम्हाला प्रचंड लाभ होईल. इतका लाभ होईल की त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तंटेबखेड्यातून तुम्ही मुक्त व्हाल. थोडक्यात जिंदगी बदलवून टाकणारा असाहा आजचा दिवस असेल.

मकर (Capricorn): जुने व्याधी उचंबळून येतील. आजाराच्या तक्रारी उद्भवतील. त्यामुळे तब्येत सांभाळा. थोडा जरी त्रास जाणवला तर डॉक्टरचा सल्ला घ्या. थोडक्यात या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा नरम गरम असाच आहे.

कुंभ (Aquarius): या राशींच्या लोकांना व्यवसायात टेन्शन देणारा आजचा दिवस आहे. मात्र, प्रेमात चार चाँद लागणार आहे. या राशीच्या लोकांचा प्रेमाचा वेलू वर वर जाणार आहे. थोडक्यात या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी असाच ठरणारा आहे.

मीन (Pisces): व्यासायिक क्षेत्रात प्रगती होईल. मात्र, तुमचे हितशत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतील. या राशीच्या लोकांची लोकप्रियता वाढेल. दुसऱ्यांवर ते अधिक प्रभाव पाडतील.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

Team Beauty Of Maharashtra