धक्कादायक ! ट्विंकल खन्ना आहे ‘या’ आजाराने त्रस्त, पोस्ट करत म्हणाली…

बॉलीवूडमध्ये अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना या जोडीची चर्चा ही मोठ्या प्रमाणात होत असते. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलेले आहे.
खिलाडियो का खिलाडी या चित्रपटात या जोडीने काम केले होते. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याची चर्चा होती. बॉलिवूडमध्येही सगळ्यात चांगली जोडी या दोघांना समजले जाते. मात्र, असे असले तरी काजोल, अजय देवगन यांची जोडी देखील लोकप्रिय आहे. शाहरुख खान, गौरी खान यांची जोडी ही लोकप्रिय आहे.
मात्र, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची चर्चा ही जरा मोठ्या प्रमाणात होत असते. आता ट्विंकल खन्ना हिने नुकतीच एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्ट मध्ये तिने आपल्याला एक आजार झाल्याचे सांगितले आहे आणि चाहत्यांना देखील यापासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे.
बॉलीवूड मध्ये अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाची कहाणी देखील अतिशय वेगळी अशी आहे. अक्षय कुमार ज्यावेळेस रविना टंडनच्या प्रेमात होता. त्याच वेळेस तो ट्विंकल हिला डेट करत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे रवीनाने त्याच्यासोबत नाते तोडून टाकले. त्यानंतर अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचे लग्न झाले.
या दोघांना आता मुले देखील आहेत. त्याचा मुलगा देखील सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. अक्षय कुमार याचे नाव रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, पूजा बत्रा सोनाली बेंद्रे यांच्यासह आणखीन काही अभिनेत्री सोबत जोडलेले आहे. मात्र, रविना टंडन सोबतचे त्याचे प्रेम प्रकरण खूपच गाजले होते. शिल्पा शेट्टी सोबतही त्याने दीर्घकाळ प्रेमसंबंध निर्माण केले.
शिल्पा शेट्टी हिला देखील त्याने लग्नाचे वचन दिले होते. मात्र, तिच्या सोबतही त्याने लग्न केले नाही. मध्यंतरी अक्षय कुमार याचे नाव प्रियंका चोप्रा हिच्या सोबतही जोडले गेले. प्रियंका चोप्रा सोबत अक्षय कुमारने अंदाज हा चित्रपट केला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याचे प्रियंका सोबत प्रेम संबंध निर्माण झाले होते.
मात्र, ट्विंकल हिने मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण संपुष्टात आल्याची चर्चा होती.आता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. मात्र, अक्षय कुमार हा आपल्या पत्नी सोबत कायम वावरताना दिसत असतो. सोशल मीडियावर तो आपले फोटो देखील शेअर करत असतो. ट्विंकल खन्ना हीदेखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
आपले फोटो ती शेअर करत असते. आता ट्विंकल हिने नुकताच एक फोटो शेअर करून तिला असलेल्या आजाराबद्दल माहिती दिली आहे. तर अनेकांना असे वाटले की हा कुठला गंभीर आजार जडला आहे. मात्र, असे काही नसून तिने स्वतःच्या बडबडी वर ही प्रतिक्रिया दिली आहे. टिंकल हिला बडबड करण्याची खूप सवय आहे आणि तिने यालाच आजार म्हटले आहे.
ट्विंकल म्हणाली की, जेव्हा मी एखादी गोष्ट बोलते तेव्हा ती करावी अशी माझी इच्छा असते. विचारपूर्वक न बोलण्याच्या आजारामुळे मला अनेकदा संकटांचा सामना करावा लागतो आणि हे खूप लज्जास्पद आहे. सतत बडबड करणाऱ्या सर्वांनी त्यांचे वाईट अनुभव कमेंट्समध्ये सांगा असे, आवाहन देखील तिने आपल्या चाहत्यांना केले आहे.
ट्विंकल हिला सतत बडबड करण्याची सवय आहे. त्यामुळे ती या गोष्टीला आजारच मानते असे तिने या वेळेस सांगितले आहे.