‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील ही अभिनेत्री कधीही करणार नाही लग्न; कारण ऐकून थक्क व्हाल

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील ही अभिनेत्री कधीही करणार नाही लग्न; कारण ऐकून थक्क व्हाल

साधारणत: दोन वर्षापूर्वी ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपली. या मालिकेत काम करणारे सगळेच कलाकार लोकप्रिय ठरले होते. ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती. या मालिकेमध्ये राणादा आणि पाठकबाई यांची कहाणी दाखवण्यात आली होती.

पाठक बाई हिची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात या मालिकेत रंगली होती. तर राणादा हादेखील अफलातून भूमिका करताना या मालिकेत दिसत होता. त्या मालिकेतील इतर भूमिकाही लोकप्रिय झाल्या होत्या. या मालिकेमध्ये राणादाची भूमिका अभिनेता हार्दिक जोशी याने साकारली होती, तर पाठक बाईची भूमिका अक्षया देवधर हिने साकारली होती.

तुझ्यात जीव रंगला ही मालिका संपल्यानंतर हार्दिक जोशी आता आपल्याला आणखीन एका मालिकेत दिसत आहे. या मालिकेचे नाव तुझ्या माझ्या संसाराला आणिक काय हवं असे आहे. ही मालिका देखील लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत तो तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे प्रमाणे रांगडा राणादा नसून एका कंपनीत काम करताना दाखवण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे अक्षय देवधर ही देखील इतर मालिकेत आता दिसत आहेत. त्याचप्रमाणे ती मॉडेलिंग आणि वेगवेगळ्या ब्रँडचे प्रमोशन करताना दिसत असते. काही दिवसापूर्वी अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचे व्हिडिओ आणि फोटो देखील फार झाले होते. या फोटोमध्ये अक्षया आणि हार्दिक हे पारंपारिक वेशभूषेमध्ये दिसत होते. त्यांचे हे फोटो अतिशय जबरदस्त असे होते.

एका ब्रँडचे त्यांनी प्रमोशन केले होते. हा कपड्याचा एक मोठा ब्रँड होता. अक्षया देवधर हीदेखील सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना वेगवेगळे व्हिडिओ देखील दाखवत असते. अक्षया देवधर हिचे काही महिन्यांपूर्वी अभिनेता सुयश टिळक याच्यासोबत प्रेम प्रकरण असल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र आता या दोघांमध्ये देखील ब्रेकअप झाले आहे. त्यामुळे आता अक्षया ही सध्या सिंगल असल्याची चर्चा आहे. अक्षया हिने काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती बिर्याणी खाताना दिसली होती. बिर्याणी आपल्याला खूप आवडते, असे तिचा सांगण्याचा हेतू होता. त्याप्रमाणे तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये वेगळ्या प्रकारचे मीम्स तयार करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये तिने लग्न कधी करणार असा प्रश्न तयार करून त्याचे उत्तर दिलेले आहे. यावर सगळ्यात शेवटी ‘नेव्हर’ असे उत्तर आले आहे. त्यामुळे तिचे चाहते देखील बुचकळ्यात पडले आहेत. तिच्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत.

पाठक बाई असे करू नका, आमचे कसे काय होणार, असे म्हणून देखील अनेकांनी कमेंट केलेल्या आहेत, तर इतर चाहत्यांनी आपण लग्न करा असे म्हटले आहे.

Team Beauty Of Maharashtra