तुझ्यात जीव रंगला मधील युवराज आठवतो का..? आहे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा मुलगा !

तुझ्यात जीव रंगला मधील युवराज आठवतो का..? आहे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा मुलगा !

झी मराठी प्रदर्शित मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ हिने पहिल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक प्रेम करतात.परंतु आता ही मालिका बंद झाली आहे. या मालिकेमधल्या, पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले.

तुझ्यात जीव रंगला- रांगडा ‘राणादा’ आणि पाठक बाई हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाचा जणू काही भागच बनले आहेत. मालिकेमध्ये नेहमीच राणा-अंजीलविरुद्ध कट-कारस्थाने करणाऱ्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेब यांनी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आणि ही भूमिका धनश्री काडगावकरने एकदम उत्तम रित्या साकारली होती. धनश्रीने याआधी देखील बऱ्याच मालिकांत काम केले आहे परंतु तिला खरी ओळख तर याच भूमिकेमुळे तिला मिळाली आहे.

धनश्रीच्या एक्झिटनंतर मालिकेने ५ वर्षांचा लीप घेतला होता या मालिकेमध्ये राणा आणि अंजलीची मुलगी राजलक्ष्मी आणि नंदिता व सुरजचा मुलगा युवराज या पात्रांची देखील एंट्री झाली होती. या मालिकेमधील हे दोन्ही चिमुरडी मुले प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते आणि त्यातही युवराज प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.

श्रेयस मोहिते- अभिनय प्रेक्षकांच्या आवडीस उतरला होता

नंदिनीप्रमाणेच तिच्या मुलाचा स्वभाव आहे, आणि त्याची ठसकेबाज बोलण्याची पद्दत तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मालिकेत दिसणाऱ्या युवराजचे खरे नाव श्रेयस मोहिते आहे. आणि हा एका प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा आहे. श्रेयसने अभिनयाचे धडे गिरवले असून त्याला अभिनयाची आवड होती.

श्रेयसची तुझ्यात जीव रंगला ही पहिलीच मालिका आहे त्याने त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयक्षेत्रातील त्याच्या करियरला सुरुवात केली आहे. त्याच्या वडिलांचे नाव संजय मोहिते असून त्याने अनेक चित्रपट, नाटकांमध्ये काम केले आहे. त्याने काही नाटकांची निर्मिती देखील केली आहे. त्याने फॉरेनची पाटलीण, वन रूम किचन, ऑन ड्युटी चोवीस तास यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये साहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली आहे.

Team Beauty Of Maharashtra