तुझ्यात जीव रंगला : राणादा- अंजलीच्या आयुष्यातील तो स्पेशल दिवस चाहत्यांच्या आजही लक्षात, शुभेच्छांचा होतोय वर्षाव!

तुझ्यात जीव रंगला : राणादा- अंजलीच्या आयुष्यातील तो स्पेशल दिवस चाहत्यांच्या आजही लक्षात, शुभेच्छांचा होतोय वर्षाव!

साधारणत: दीड ते दोन वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर तुझ्यात जीव रंगला ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतील राणादा आणि पाठक बाईच्या भूमिकेचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. त्यांची केमिस्ट्री एवढी गाजली होती की, खऱ्या आयुष्यात देखील या दोघांनी लग्न करावे, असे सांगण्यात येते.

आता देखील या दोघांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या दोघांनी लग्न केले की काय असा देखील अनेकांना प्रश्न पडला आहे, तर याबाबतचे सत्य आम्ही आपल्याला आत्ता सांगणार आहोत. राणादा ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशी याने साकारली तर पाठक बाईची भूमिका अभिनेत्री अक्षया देवधर हिने साकारली होती.

अक्षया देवधर हिने अतिशय जबरदस्त असे काम या मालिकेत केले. अतिशय निरागस असा लूक अक्षयाचा आहे. त्यामुळे तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पावती मिळाली होती. अक्षया देवधर ही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अक्षया देवधरचे अनेक व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर शेअर होत असतात.

ती आपल्या चाहत्यांशी संवाद देखील साधत असते. अक्षयाने काही दिवसापूर्वी तिचा एक बिर्याणी खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले होते की, मला बिर्याणी खूप आवडते. त्याचप्रमाणे अभिनेता हार्दिक जोशी हा देखील सोशल मीडियावर सक्रिय असतो.

आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. काही महिन्यांपूर्वी त्याने अनेक फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तो नवरदेवाच्या लूकमध्ये दिसत होता. नंतर असे कळले की, ही एक जाहिरात आहे आणि जाहिरातीचे प्रमोशन करण्यासाठी त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आतादेखील अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी लग्न केले की काय अशी चर्चा होताना दिसत आहे.

मात्र, अक्षया देवधर हिचे सुयश टिळक याच्यासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, काही दिवसांपूर्वी या दोघांचेही प्रेम प्रकरण संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता अक्षया ही हार्दिक जोशी याच्यासोबत विवाहबंधनात अडकली की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. कारण की या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.

मात्र, आम्ही तुम्हाला सांगतो मित्रांनो की, हे फोटो या दोघांच्या लग्नाचे नसून तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील आज आहे ज्यावेळेस या दोघांचे मालिकेत लग्न झाल्याचे दाखवण्यात आले. त्यावेळेसचे हे फोटो आहेत. त्यांच्या लग्नाला काही दिवसांपूर्वीच वर्ष पूर्ण झाले असे या मध्ये दाखवण्यात आलेले आहे. त्यामुळे या लग्नाची आठवण म्हणून अक्षयाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मात्र अनेकांना असे वाटते की या दोघांनी लग्न केले की काय. मात्र असे काही नाही तर अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे आवडतात का आम्हाला नक्की सांगा

Team Beauty Of Maharashtra