तुझ्यात जीव रंगला ! अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा पार पडला साखरपुडा

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचल्या अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. मालिकेनं निरोप घेतल्यानंतरही दोघं नेहमीच चर्चेत असतात. अक्षयाच्या स्टायलिश फोटोंची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते. आता पुन्हा एकदा या दोघांनी चाहत्यांना धक्का दिला आहे. हा धक्का आहे या दोघांच्या साखरपुड्याचा.
अक्षया आणि हार्दिक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.दोघांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. फोटोंमध्ये त्यांचा स्टायलिश अंदाजही पाहायला मिळतोय. फोटोंमधील दोघांची केमेस्ट्रीही चाहत्यांना आवडतेय.