‘माझी तुझी रेशीमगाठी’ मधील नेहाने दिली ‘गुडन्यूज’

‘माझी तुझी रेशीमगाठी’ मधील नेहाने दिली ‘गुडन्यूज’

सध्या झी मराठीवर अनेक नवनवीन मालिका येत आहेत. त्यातच आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यात यशस्वी होताना दिसत आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत कथानक हे थोडेसे वेगळ्या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

या मालिकेत यश,नेहा आणि परी हे तीन पात्र मुख्य भूमिकेत आहेत. यशचा मित्र समीर हा देखील यशसोबत अतिशय उत्कृष्टपणे काम करताना दिसत आहे. आजोबांच्या भूमिकेत मोहन जोशी भूमिका साकारली होती. मात्र, आता त्यांच्या जागी प्रदीप वेलणकर हे दिसत आहेत.

यश म्हणजे श्रेयस तळपदे ,तर नेहाच्या भूमिकेत प्रार्थना बेहेरे ही असून प्रार्थनाची मुलगी परी म्हणजेच मायरा वायकुळ आहे. तर ही मालिका प्रेक्षकांच्या मनात कमी वेळात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. चिमुकली परी उत्कृष्ट भूमिका साकारताना दिसत आहे. यश म्हणजेच श्रेयस तळपदे याने अनेक हिंदी तसेच मराठी मालिकामध्ये काम केलेले आहे.

श्रेयस तळपदे सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा मालिकांमध्ये काम करताना आपणासमोर दिसत आहे. नेहा आणि परीची जोडी खूप छान आहे. परीला वडील नसतात. या मालिकेमध्ये नेहाच्या भूमिकेत आपल्याला प्रार्थना बेहेरे ही अभिनेत्री दिसली आहे. प्रार्थना बेहेरे हिने अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे.

तर काही हिंदी मालिकामध्ये देखील काम केले आहे. अवधूत गुप्ते याच्या महाराष्ट्र भटिंडा या चित्रपटात तिने काम केले होते. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. मात्र अनेक दिवसानंतर आता ती मालिकांमध्ये दिसत आहे. तिची या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

आता माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमधून नेहा म्हणजेच प्रार्थना बेहेरे हिने ही मालिका सोडली असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर रंगली होती. मात्र, असे काही नसून नेहा लंडनला गेल्याचे दाखवण्यात आले आहे, तर नेहा लंडन ला गेल्यामुळे तिने मालिकेतून ब्रेक घेतला की काय अशी चर्चा झाली होती.

मात्र, आता सोशल मिडीयावर तिने शेअर केला आहे. आता प्रार्थना बेहेरे नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रार्थना बेहेरे ही सांगत आहे की, आपल्याला वाटत असेल की, मी लंडन येथे गेले आहे. त्यामुळे मी ही मालिका सोडली आहे की काय असे अनेकांना वाटत असेल. मी यश आणि परी या दोघांनाही मिस करत आहे.

त्यामुळे मी लवकरच या मालिकेत दिसणार आहे, असे तिने सांगितले आहे. त्यामुळे प्रार्थना हिने ही मालिका सोडली नसून ती आपल्याला लवकरच मालिकेत दिसणार आहे.

Team Beauty Of Maharashtra