‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत आता परी दिसणार नाही ?

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत आता परी दिसणार नाही ?

झी मराठीवरील अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ही मालिका अल्पावधीतच टीआरपीच्या क्षेत्रातही अव्वलस्थानी असल्याचे चर्चिले जाते.

या मालिकेतील सर्व पात्र हे अभिनयानं या दृष्टीने पाहिले तर अनुभवी आहेत. त्यामुळे ही मालिका कमी वेळात अव्वल स्थानी आहे. यशची भूमिका श्रेयस तळपदे करत आहे, तर मालिकेत मोहन जोशी आजोबाच्या भूमिकेत असून समीर म्हणजेच संकर्षण कराडे यशचा मित्र आहे.

नेहाची भूमिका प्रार्थना बहेरे करत आहे. असे एकूण सर्वच अनुभवी कलाकार या मालिकेत असल्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक होत आहे. या मालिकेत परीची भूमिका साकारणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री मायरा वायकूळ आहे. फक्त आणि फक्त परीसाठी ही मालिका पाहणारे अनेक जण आहेत.

या मालिकेत यश आणि परीची जोडी खूपच गाजत आहे. ही जोडी मैत्री कशी असावी व मैत्री कोणत्याही वयात होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण आहे. परी हि नेहाची मुलगी आहे. या मालिकेत परीला जन्मताच शुगरचा त्रास असतो. तिला रोज सकाळी इंजेक्शन द्यावे लागत असते, असे दाखवण्यात आले आहे.

इंजेक्शन देताना नेहाला खूप त्रास होत असतो. एक दिवस यश परीला इंजेक्शन देण्याचे ठरवतो. पण त्याला जमत नाही. त्या दोघांमध्ये खूप छान निखळ मैत्री असते. सध्या या मालिकेत मोठ्या सरांच्या घरी दिवाळीसाठी मुंबई ऑफिसचे सर्व कर्मचारी बोलवण्यात येतात. त्यावेळी घरात लक्ष्मीची मूर्ती सापडत नाही, म्हणून गोंधळ चाललेला असतो.

मोठे सर म्हणजेच यशचे आजोबा चिडलेले असतात. परंतु प्रसंगावधान दाखवून नेहा तिथे तिच्या जवळ असलेले चांदीचे लक्ष्मीचे नाणे देते आणि आजोबांना म्हणते की, सर मी तुमच्यापेक्षा अनुभवाने लहान आहे, परंतु लक्ष्मी कोणत्याही रूपात येऊन आज आशीर्वाद देऊन जात असते.

कदाचित या रूपात लक्ष्मीला आज येथे यायचं असेल, तर तुम्ही हे नाणे पूजेसाठी घ्यावे असे मला वाटते. त्यावर आजोबा ते नाणे घेतात आणि पूजा करतात. मोठ्या सरांच्या घरी परीला ही येण्याची इच्छा असते. पण नेहा तसे करत नाही. परी घरच्या लक्ष्मीपूजनासाठी आईची वाट पाहत असते.

तिला फोन करुन विचारते तू कधी येणार त्यावर ती मी लवकरच येत आहे असे सांगते. परी म्हणजेच मायरा वायकूळ ही माझी तुझी रेशीमगाठ मालिका सोडणार असल्याचे सोशल मीडियावर चर्चिले जात आहे. याचे कारण म्हणजे तिच्या आजोबांचे नुकतेच निधन झाले आहे.

तर ती काही दिवसांसाठी या मालिकेत दिसणार नाही, असे सांगण्यात येत आहे. मायरा काही दिवसांसाठी आजोबांच्या गावी जाणार आहे. त्या कारणामुळे मायरा काही दिवस या मालिकेत दिसणार नाही. पण ती कुठे जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले असल्यामुळे मायरा ही मालिका सोडणार नाही आणि काही दिवसांसाठी या मालिकेतून बाहेर देखील जाणार नाही.

अनेक प्रेक्षकांचा मते फक्त परी साठी आम्ही ही मालिका पाहतो. त्यामुळे असे होता कामा नये असे देखील सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षकांना सांगणे महत्त्वपूर्ण ठरेल की परी ही मालिका सोडणार नाही. हे मात्र नक्की आपणास मायरा परीची भूमिका साकारत आहे ती आवडते का नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra