‘तुम बिन’ मधील हा अभिनेता आठवतो का? एकेकाळी हॅण्डसम हंक असणारा हिमांशू आता दिसतो प्रचंड वयस्कर

‘तुम बिन’ मधील हा अभिनेता आठवतो का? एकेकाळी हॅण्डसम हंक असणारा हिमांशू आता दिसतो प्रचंड वयस्कर

साधारणतः 2001 च्या सुमारास अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये धडकले होते. यामध्ये अनेक अभिनेत्यांची देखील नव्याने इंट्री झाली होती. यामध्ये ‘तुम बिन’ नावाचा हा एक चित्रपट देखील आला होता. अतिशय रोमँटिक गाणी, म्युझिकल असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना त्यावेळेस खूप आवडला होता.

तरुण वयात असलेल्या मंडळींनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले होते. या चित्रपटामध्ये राकेश बापट, प्रियांशू चॅटर्जी, संदली सिन्हा यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील गीतही अतिशय लोकप्रिय असे ठरले होते. या चित्रपटामध्ये एक आणखीन अभिनेता दिसला होता, त्याच्याबद्दलच आम्ही आपल्याला आज माहिती देणार आहोत.

हा अभिनेता आता कुठे आहे, काय करत आहे याबाबतही कोणालाही माहित नाही. त्याला ओळखणे कठीण झाले आहे. तुम बिन चित्रपटामध्ये राकेश बापट याने देखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. मराठमोळा असलेला हा अभिनेता सुरुवातीला मॉडल होता. त्यानंतर त्याने काही जाहिरातींमध्ये काम केले.

मात्र, त्याला हा चित्रपट मिळाला आणि त्याचे करिअर पालटले. या चित्रपटाने त्याला यश मिळवून दिले. मात्र, त्यानंतर त्याने काही चित्रपट केले अपेक्षेप्रमाणे त्याचे सगळे चिञपटानंतर बॉक्स ऑफिसवर आपटले. त्यानंतर तोदेखील चित्रपट सृष्टी मधून जणू लांबच झाला.

याचप्रमाणे या चित्रपटामध्ये प्रीयांशू चटर्जी याची देखील भूमिका होती. बंगाली असलेला हा अभिनेता अतिशय हँडसम असा आहे. हा चित्रपट केल्यानंतर त्याच्याकडे देखील फारसे काम राहिले नाही. कारण की सातत्यपूर्ण कामगिरी त्याला करता आली नाही. त्यामुळे तो देखिल आता काय करतो, याबद्दल अनेकांना माहिती देखील नाही.

या चित्रपटात संदली सिन्हा ही देखील एक गोंडस अभिनेत्री दिसली होती. तिने देखील अप्रतिम अभिनय आणि आपल्या सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटात आणखीन एक अभिनेता होता या अभिनेत्याचे नाव हिमांशू मलिक असे होते. तुम बिन या चित्रपटामध्ये त्याने जबरदस्त अशी भूमिका केली होती.

अतिशय हँडसम दिसणारा हा अभिनेता या चित्रपटानंतर रातोरात सुपरस्टार झाला होता. हजारो तरुणींच्या मनामध्ये त्याने घर देखील केले होते. 1996 मधले त्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती. कामसूत्र द टेल स्टोरी या चित्रपटात त्याने काम केले होते. हा चित्रपट बराच गाजला होता. त्यानंतर त्याने जंगल, एल ओ सी कारगिल, ख्वाईश, रोग यासारख्या चित्रपटातही काम केले.

मात्र, गेल्या काही वर्षापासून तो बॉलिवूडमध्ये दिसेनासा झाला आहे. आता त्याला ओळखणे देखिल कठीण झाले आहे. त्याची हेअर स्टाईल देखील पूर्णतः बदलली आहे, तो म्हातारा दिसत आहे. त्याचे वय सध्या 48 वर्षाच्या आसपास आहे. तुम बिन मध्ये दिसणारा हा अभिनेता आता कोणाला ओळखता देखील येत नाही

Team Beauty Of Maharashtra