ह्या ३ महिलांनी तुळशीची पूजा चुकूनही करू नये, घर होते बरबाद

ह्या ३ महिलांनी तुळशीची पूजा चुकूनही करू नये, घर होते बरबाद

प्रत्येक हिंदू धर्मिय लोकांचा घरापुढे तुळशीचं रोपट असतं तुळशवृंदावन असतं आपण तुळशीची मनोभावे पूजा करतो.हिंदुधर्म शास्त्र असं मानत की ज्या व्यक्ती तुळशीची मनोभावे पूजा करतात त्या घरामध्ये सुख सौभाग्य नांदत त्या घरावर येणारी संकट आधी तुळस स्वतः ग्रहण करते.

जर तुमच्या घराजवळच तुळस सुकु लागली अचानक ती सुकली तुम्ही पाणी घालताय,त्याची पूजा करताय मात्र तरीही तुळस कोमेजत असेल तर लक्षात घ्या तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर काहीना काही संकट, आपदा, विपत्ती येणार आहे.त्या संकटाची आगाऊ सूचना ही तुळस आपल्याला देत असते.

तुळस खरतर एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अनेक रोग बरे करण्याची क्षमता या वनस्पतीमधे आहे. आयुर्वेदाने या तुळशीचं महत्व मान्य केलेलं आहे.आणि आपल्या घरात वास्तूमधे जी नकारात्मकता असते तिचा नाश करण्याच प्रमुख कार्य ही तुळस करत असते. आणि त्यामुळेच आपल्याघरात माता लक्ष्मीच वास्तव्य राहतं. मटा लक्ष्मी अश्याच घरात प्रवेश करतात ज्या घरामधे नकारात्मकता नसेल जर माता लक्ष्मीचा स्तैवास आपल्या घरामधे करायचा असेल तर तुळशीचं रोपत अवश्य लावाव व त्याची दररोज नित्यानियमने पूजा करावी व जल अर्पित करावं.

तुळशीची पूजा करताना ओम् नामो भगवते वासुदेवाय यासारख्या महामांत्रांचा सातत्याने जप करावा.खूप चांगली फळं मिळतात. घरात लावण्यासाठी शाम तुळस ,राम तुळस, कृष्ण तुळस असेल या तुळशी अत्यंत चांगल्या शुभ फलदायी मानल्या जातात आणि हो देव उठणी एकादशीला आपण तुळशी विवाह संपन्न करत असतो.जी विवाहित जोडपी आहेत त्यांनी तुळशी विवाह नक्की संपन्न करावा. अनेक प्रकारची शुभ फळं एक प्रकारचं पुण्य प्राप्त होत असत.

तुळशीची पूजा कोणत्या तीन महिलांनी करू नये.हिंदू धर्म शास्त्रात सर्वात प्राचीन नियम असा आहे की ज्या महिलांना मासिक धर्म चालू आहे महिन्यातले जे पाच दिवस आहेत त्या पाच दिवसात अनेकजण अज्ञानुवश देवपूजा तर करत नाहीत मात्र तुळशीला पाणी घालतात. मासिक पाळी मधे आपण फक्त मंत्र जप करू शकता त्यासाठी परवानगी आहे. मात्र कोणत्याही स्वरूपात तुळशीची पूजाही करून नये आणि तुळशी जवळ बसुही नये,तुळशीच्या झाडाला स्पर्श करू नये त्यामुळे आपण पापाचे भागीदारी बनतो. माता तुळशीचा क्रोध आपल्यावर उत्पन्न होऊ शकतो.

प्राचीन काळापासून हि प्रथा चालत आलेली आहे.दुसरी गोष्ट ज्या महिलांचा विवाह झालेला नाहीये ज्या अविवाहित आहेत त्यांनी तुळशी पूजा करू नये. आणि अविवाहित जोडप्यांनी तुळशी विवाह संपन्न केला जाऊ शकतो पण ज्या जोडप्यांच धर्मशास्त्र पध्दतीने विवाह संपन्न झालेला असेल तरच ते करू शकतात.

कोर्टात लग्न झालं असेल किंवा कोणतेही धर्मीक संस्कार पर पाडले नसतील धर्मीक रितीरिवाजप्रमाणे विवाह झालेला नसेल तर त्यांनी आपल्या घरामधे तुळशी विवाह करू नये त्याने अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात . कुटुंबावर अनेक प्रकारचे दोष येऊ लागतात मानसन्माना मधे कमी येते. तुमच्यावर नकळत काही दोष उत्पन्न होतात काही आरोप लागतात. तर याप्रकारची चूक करू नका धर्म रीतिरिवाजा प्रमाणे विवाह करा.

गर्भवती महिलांच्या बाबतीत एक गोष्ट गर्भवती महिलांनी देवपूजा तर करूनयेच आणि त्यांनी तुळशी जवळ जाण सुद्धा टाळावं कारण हिंदू धर्म शास्त्र असं मानत की गर्भवती महिलांनी गर्भार पणात तुळशीची पूजा केली तर गर्भ दोष उत्पन्न होऊ शकतात . ज्यांचा अप्रत्यक्ष रीत्या जे नुकसान आहे ते आपल्या गर्भाला सोसावं लागू शकत. आणि म्हणून गर्भवतीने तुळशीच्या पूजेत सहभागी होऊ नये.

आपण तुळशीची पूजा करताना स्वछ असावं, निर्मळ असावं, कोणत्याही प्रकारची वाईट भावना किंवा चुकीच्या भावना आपल्या मनात नसाव्यात आणि जर अश्यारपकरच्या भावना मनात येत असतील तर आपण तुळशी पूजा नकेलेली चांगल कारण अशी पूजा तर तुळस तर स्वीकार करत नाहीच मात्र उलट अशी चरीत्रहीन लोकांनी केलेली पूजा अस्विकर होऊन त्याची वाईट फळं मात्र आपल्याला नक्की मिळतात . तुळशी पुजे मधे या गोष्टींचं ध्यान नक्की ठेवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra