३ दिवसांनी ‘या’ ५ राशी होणार प्रचंड श्रीमंत? पौष अमावस्येला ‘या’ रूपात माता लक्ष्मी करू शकते पैशांचा वर्षाव

३ दिवसांनी ‘या’ ५ राशी होणार प्रचंड श्रीमंत? पौष अमावस्येला ‘या’ रूपात माता लक्ष्मी करू शकते पैशांचा वर्षाव

हिंदू धर्मात पौष मास हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सरत्या वर्षात २३ डिसेंबरला म्हणजेच येत्या शुक्रवारी पौष अमावास्या असणार आहे. वैदिक ज्योतिषानुसार पौष अमावास्या ही ५ राशींसाठी अत्यंत शुभ सिद्ध होणार आहे. पौष महिन्यातील अमावस्या ही शुक्रवारी येत आहे, जो की वैभवदाता शुक्र ग्रह व माता वैभवलक्ष्मीचा वार मानला जातो.

या महिन्यात काही दिवसांपूर्वीच म्हणजेच १६ डिसेंबरला सूर्याचे गोचर होऊन ग्रहांचा राजा धनु राशीत स्थिर झाला आहे. शनी, बुध व गुरु सुद्धा अत्यंत शुभ स्थितीत असून त्यांच्या युतीने दुर्मिळ असा केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. या ज्योतिषीय घटनांच्या प्रभावाने खालील ५ राशींसाठी अत्यंत फायदेशीर काळ सुरु होणार आहे. येत्या काळात या ५ राशींना प्रचंड धनलाभासह प्रगतीचे योग तयार होत आहेत.

कधी सुरु होत आहेत पौष अमावस्या?
पौष महिन्यातील अमावास्येची तिथी २२ डिसेंबर २०२२ च्या संध्याकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी सुरु होणार आहे तर २३ डिसेंबर २०२२ च्या सदुपारीं ३ वाजून ४६ मिनिटांवर अमावस्या संपेल. उदयतिथी नुसार २३ डिसेंबर हा दिवस पौष अमावास्येची मूळ तिथी मानला जाईल.

‘या’ राशींना पौष अमावस्या देऊ शकते धनलाभ
कर्क (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी पौष अमावस्या अत्यंत शुभ ठरू शकते. विशेषतः तुमच्या करिअर व कामाच्या बाबत अनेक प्रगतीच्या संधी तुमच्या नशिबाचे दार ठोठावतील. तुम्हाला येत्या काळात जुन्या गुंतवणुकीतून मोठा धनलाभ होऊ शकतो. या आर्थिक नफ्याचा वापर करण्यासह गुंतवणूक करायला सुद्धा विसरू नका.

कन्या- कन्या राशीच्या लोकांसाठी नवनवीन संधी घेऊन पौष अमावस्या येणार आहे. तुम्हाला स्वतःला आर्थिक लाभासाठी अनेक कल्पना सुचतील. यातील काही विचार हे निरर्थक वाटू शकतील पण जर तुम्ही त्यावर नीट विचार करून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काम केल्यास यातूनच प्रचंड धनलाभ होऊ शकतो. आयुष्यात एक सुखाची व सकारात्मक काळ अनुभवण्याचे भाग्य आपल्या कुंडलीत आहे.

तूळ- पौष अमावस्या तुमच्यासाठी करिअरमध्ये प्रगती घेऊन येऊ शकते. अनेक अडकलेली कामे मार्गी लागण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करायला चुकू नका .

वृश्चिक- वृश्चिक राशीच्या विशेषतः विद्यार्थी दशेतील मंडळींसाठी येणारी पौष अमावस्या प्रगतीचे योग घेऊन येत आहे. तुम्ही जर नव्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला लवकरच मोठ्या पगारवाढीसह उत्तम ऑफर्स मिळू शकतात.

कुंभ- कुंभ राशीसाठी तर येणारा काळ सुखाचे अनेक योग घेऊन येत आहे. १७ जानेवारी २०२३ मध्ये शनि गोचर होण्याआधी आता सर्वात लाभाच्या स्थानी कुंभ रास आहे. तुमचे जुने वाद संपुष्टात येऊन नात्यात प्रेम वाढीस लागू शकते. याच नात्यांमधून तुम्हाला आर्थिक लाभाचेही संकेत आहेत. समाजात तुमचा मान वाढू शकतो.

Team BM