सोशल मीडिया TikTok Star फैसू याला ओशिवरा पोलिसांनी केली अटक

सोशल मीडिया TikTok Star फैसू याला ओशिवरा पोलिसांनी केली अटक

भारताने काही महिन्यापूर्वी चीनच्या उपद्व्यापीपणाला कंटाळून चीन ऑपरेट करत असलेले अनेक‌ अॅप प्लेस्टोरवरून काढून टाकले आहेत. यामध्ये जवळपास शंभर एक ॲप्स समावेश होता. चीनचे काही ॲप्स लोन देखील देत होते. या लोनच्या माध्यमातून अव्वाच्या सव्वा रक्कम ते व्याजाच्या स्वरूपात सामान्य नागरिकांकडून उकळत होते.

त्यामुळे केंद्र सरकारकडे याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याच बरोबर चीनचे टिक टॉक नावाचे एक ॲप देखील भारतामध्ये खूप लोकप्रिय झाले होते. या टिक टॉक ॲपचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय भारतामध्ये होता. हा व्यवसाय जवळपास हजार कोटींमध्ये असल्याचे सांगण्यात येते.

तसेच भारताच्या सुरक्षेला देखील या चीनच्या ॲपच्या माध्यमातून खूप मोठा धोका निर्माण झाला होता. त्याच बरोबर सीमेवर चीनने अनेक कुरापती सुरु केल्या होत्या. त्यामुळे भारताने टिक टॅाक सह इतर ॲप्स देखील ताबडतोब प्ले स्टोर वरून काढून टाकले. त्यामुळे भारतामध्ये आता टिक टॉकच्या जागी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

मात्र, टिक टॉकची वेड अजूनही कमी झालेले नाही. अनेकांनी टिक टॉकच्या माध्यमातून लाखो रुपये कमाई केल्याचे देखील समोर आले आहे. अनेक तरुण टिक टॉक च्या माध्यमातून आपले छोटे आणि वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायचे.

हे व्हिडिओ शेअर झाल्यानंतर त्यांना अनेक जण पाहायचे आणि त्यांचा मग खूप मोठा फॅन फॉलॉवर तयार व्हायचा. या माध्यमातूनच अशा टिक टॉक स्टार ला खूप मोठे पैसे देखील मिळायचे. माधुरी पवार ही एक मराठीतील टिक टॉक स्टार आपल्याला माहीत असेल.

माधुरी पवार हिने या माध्यमातूनच सुरुवातीला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. टिक टॉक मध्ये तिला लाखो चाहते मिळाले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर तिला मालिकादेखील काम मिळाले. तुझ्यात जीव रंगला आणि देव माणूस या सारखी मालिका देखील तिने केली. आता नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे.

टिक टॉक मध्ये नावारूपास आलेला फैसू हा य स्टार चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे रात्रीच्या वेळेस त्याने मुंबईच्या एका कॉलनीमध्ये बेदरकारपणे कार चालवून एका अपार्टमेंटच्या गेटला जोरदार धडक दिली. त्यानंतर तो कारच्या बाहेर आला आणि त्यानंतर तिथून तो निघून गेला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, रात्री साडे अकराची वेळ असेल. त्याच वेळेस आमचे हॉटेल बंद करण्याची वेळ झाली. मी माझ्या वॉचमनला जेवण दिले आणि तो आत मध्ये जाऊन जेवत होता. मी देखील सामान उचलून मध्ये ठेवून दिले आणि त्याच वेळेस मी घरामध्ये गेलो.

त्याच वेळेस बिल्डींगच्या गेट ला जोरात धडकण्याचा आवाज झाला. आम्ही सगळे जण खाली येउन पाहीले तर आमच्या सोसायटीचे गेट तुटलेले होते. खूप नुकसान झाले होते. त्यामध्ये फैसू नावाचा हा टिक टॉक स्टार होता, असे अनेकांनी सांगितले. आमच्या सोसायटीला सीसीटीव्ही नाही. मात्र, ओशिवारा परिसरामध्ये काही सीसीटीव्ही असतील.

त्यामध्ये ही घटना चित्रित झाली असेल, असे देखील प्रत्यक्षदर्शीने सांगितले. आम्ही आता पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहे. त्याच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. त्याला अटक करण्याची मागणी देखील केली आहे. त्याचप्रमाणे आमच्या सोसायटीचे झालेले नुकसान भरून द्यावे, अशी मागणी देखील केली आहे.

जर येथे कुठला व्यक्ती असता तर निश्चितच खूप मोठी दुर्घटना घडली असती असेही ते म्हणाले. आमच्या सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी येथे आले नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, तो नशेत होता की नाही हे आम्हाला आताच सांगता येणार नाही, असे देखील त्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

Team Beauty Of Maharashtra