‘ठिपक्यांची रांगोळी’ मधील अपूर्वा च्या खऱ्या आयुष्याबाबत

स्टार प्रवाह वाहिनीवरील नुकतीच सुरू झालेली “ठिपक्यांची रांगोळी” ही मालिका प्रेक्षकांना आवडत असल्याचं दिसत आहे. या मालिकेत अभिनेता चेतन वडणेरे शशांक हा मुख्य पात्र साकारत आहे, तर अपूर्वाची भूमिका ज्ञानदा रामतिर्थकर निभावत आहे.
मालिकेत शंशाक ही भूमिका साकारणारा अभिनेता चेतन वडणेरे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याच कारण देखील तसच आहे. चैतन्यने अभिनेत्री ऋजुता धारप हिच्यासोबत एक फोटो काही दिवसांपूर्वी शेअर केला आहे. या फोटोवरून तो अभिनेत्री ऋजुता हिला डेट करत असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच या दोघांनी लेह- लदाख ची ट्रीप एकत्रित एन्जॉय केली. त्यावरून हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत, असे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. अभिनेता चेतन वडणेरे हा झी मराठी वाहिनीवरील ‘अल्टी पलटी सुमडीत कल्टी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसला होता, तर झी युवा वरील “फुलपाखरू” या लोकप्रिय मालिकेत झळकला होता.
ठिपक्यांची रांगोळी ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. तसेच या मालिकेतील अपूर्वा आणि शशांक यांची जोडी देखील अनेक प्रेक्षकांना आवडते. आज आपण अपूर्वा म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिच्या रियल लाईफ बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
ज्ञानदा रामतीर्थकरचा जन्म हा सांगली येथे झाला. परंतु ती लहानाची मोठी पुण्यातच झाली. तिच्या वडिलांचे नाव अनिल रामतीर्थकर असे आहे, तर आईचे नाव मेधाविनी रामतीर्थकर असे आहे. तिने आपले शालेय शिक्षण पुण्यातील पी एस मॉडर्न हायस्कूल मधून पूर्ण केलं. तर मराठवाडा मित्र मंडळ मधून बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले.
जिंदगी नॉट आउट, शतदा प्रेम करावे या मालिकेत तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत, तर शादी मुबारक, धुराळा, दिल दोस्ती दुनियादारी या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. येथे जवळी रहा, प्रेमाची आरती या म्युझिक अल्बम सॉंग मध्येही ज्ञानदाने काम केले आहे आणि आता आपण ज्ञानदा हिला अपूर्वाच्या भूमिकेत पाहत आहोत.
तर तुम्हाला अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर म्हणजेच अपूर्वा चा अभिनय आवडतो का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.