देवघरात किंवा मंदिरात वाजवल्या जाणाऱ्या घंटे बद्दल घ्या जाणून

देवघरात किंवा मंदिरात वाजवल्या जाणाऱ्या घंटे  बद्दल घ्या जाणून

मंदिर किंवा घरातील पूजा घरात तुम्ही गरुड घंटीला बघितले असेल. मंदिराच्या वेशीवर आणि विशिष्ट ठिकाणी घंटी किंवा घंट्या ठेवण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. घंटी हा एक विशेष प्रकारचा नाद असतो जो आसपासच्या वातावरणाला शुद्ध करते.

1. गरुड घंटी : गरुड घंटी ही लहान असते जी एका हाताने सुद्धा वाजवली जाऊ शकते.

2. द्वार घंटी : ही घंटी दाराशी लटकवलेली असते. ही घंटी लहान व मोठी या दोन्ही पण आकाराची असते.

3. हात घंटी : ही घंटी पितळाच्या एका ठोस गोल ताटली सारखी असते जीला लाकडाच्या एका गद्दाने ठोकून वाजवली जाते.4. घंटा : हा खूपच आकाराने मोठा असतो. कमीतकमी 5 फूट उंच व रुंद असतो. याला वाजल्यानंतर आवाज कित्येक किलोमीटर पर्यंत जातो..

हिंदू धर्मातील सृष्टीच्या निर्मितीमध्ये आवाजाचे महत्त्वपूर्ण योगदान मानले जाते. आवजपासून प्रकाशाची निर्मिती आणि बिंदू रूपातील प्रकाशातून आवाजाच्या निर्मितीचा सिद्धांत हिंदू धर्माचाच आहे. जेव्हा सृष्टीची सुरुवात झाली तेव्हा जो नाद होता, घंटीच्या आवाजाला त्याचे प्रतीक मानले जाते. हाच नाद ओंकाराच्या उच्चारातून सुद्धा जागृत होतो.

ज्या ठिकाणांहून घंटीचा आवाज नियमित पणे येतो तेथील वातावरण हे नेहमी शुद्ध व पवित्र राहते. यामुळे नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते. नकारात्मकता निघून गेल्याने समृद्धीचे दरवाजे उघडतात. सकाळी आणि संध्याकाळी हा घंटी वाजवायचा नियम आहे. तेही तालबद्ध.

घंटी किंवा घंटा यांस काळाचे प्रतीक देखील मानले जाते. असे मानले जाते की प्रलयाचा काळ येईल तेव्हा अशाच प्रकारे नाद म्हणजे आवाज येईल.

ज्या ठिकाणांहून घंटीचा आवाज नियमित पणे येतो तेथील वातावरण हे नेहमी शुद्ध व पवित्र राहते. यामुळे नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते. नकारात्मकता निघून गेल्याने समृद्धीचे दरवाजे उघडतात.

स्कंद पुराणांनुसार मंदिरात घंटी वाजवल्याने माणसाचे शंभर जन्माची पापे नष्ट होऊन जातात आणि असे सुद्धा म्हणले जाते की घंटी वाजवल्याने आपली देवतांसमोर उपस्थिती लागते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra