‘तारक मेहता…’ मधील माधवी भिडे आहे कोट्यवधींची मालकीण; आलिशान घर, लग्झरी कार आणि बरंच काही

‘तारक मेहता…’ मधील माधवी भिडे आहे कोट्यवधींची मालकीण; आलिशान घर, लग्झरी कार आणि बरंच काही

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोनी सब या वाहिनीवर गेल्या तेरा वर्षापासून अविरतपणे सुरू आहे. या मालिकेत काम करणाऱ्यांना काही जणांनी ही मालिका सोडली असली तरी या मालिकेची लोकप्रियता अजूनही कमी झाली नाही.

मालिकेत काम करणारा सोढी याने ही मालिका काही दिवसापूर्वी सोडलेली आहे. त्याचप्रमाणे सोनू हे पात्र देखील बदलण्यात आले आहे. टप्पू ची भूमिका देखील बदलण्यात आली आहे .तरीदेखील ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये माधवी भिडे ही भूमिका देखील प्रचंड गाताना दिसत आहे.

मालिकेमध्ये दयाबेन ही भूमिका देखील प्रचंड गाजली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी दयाबेन म्हणजेच दिशा वकानी हिने ही मालिका सोडली आहे. लग्न झाल्यानंतर ती गरोदर राहिली होती. त्यामुळे तिने ही मालिका सोडली होती. मात्र, त्यानंतर ती अजूनही मालिकेत परतली नाही. तरीदेखील ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

या मालिकेमध्ये जेठालाल, हाथी, चंपकलाल, तारक मेहता, अंजली भाभी, बबिता, अय्यर, डॉक्टर हाथी, गोली, गोगी, सोनू या भूमिकादेखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात. या मालिकेमध्ये माधवी भिडे ही भूमिका अभिनेत्री सोनालिका जोशी यांनी साकारलेली आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेची निर्मिती असित कुमार मोदी यांनी केलेली आहे.

ते देखील अधून मधून या मालिकेमध्ये दिसत असतात. निखळ मनोरंजन आणि काहीतरी सामाजिक संदेश देणे असाच या मालिकेचा उद्देश आहे. त्यामुळे ही मालिका अजूनही कोणाला कंटाळवाणी वाटत नाही. जेठालाल ने साकारलेली भूमिका अभिनेते दिलीप जोशी यांनी केली आहे. दिलीप जोशी हे दिग्गज अभिनेते आहेत.

त्यांनी जबरदस्त काम या मालिकेत केले आहे. त्याच प्रमाणे बबिता ची भूमिका मुनमुन दत्ता हिने साकारली आहे. या मालिकेमध्ये माधवी भिडे म्हणजेच सोनालिका जोशी या वैयक्तिक आयुष्यामध्ये डिझाईनिंग बिझनेस सांभाळतात. त्यांचा मुंबईमध्ये आलिशान थ्री बीएचके फ्लॅट आहे. हा फ्लॅट घेण्याआधी सोनालिका जोशी या बोरिवली येथे वन बीएचके फ्लॅटमध्ये राहत होत्या.

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेने त्यांचे आयुष्य बदलून गेले. तसेच त्यांच्याकडे 18 लाख रुपयांची एमजी हेक्टर ही आलिशान कार देखील आहे. त्याचप्रमाणे टोयोटा आणि मारुतीच्या देखील त्यांच्याकडे आलिशान गाड्या असल्याचे सांगण्यात येते.

सोनालिका यांनी पाच एप्रिल 2004 मध्ये लग्न केले असून त्यांच्या पतीचे नाव समीर जोशी असे आहे. सोनालीका आणि समीर यांना आर्या ही एक मुलगी देखील आहे. सोशल मीडियावर सोनालिका या खूप सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांशी त्या अनेकदा फोटो आणि इतर माहिती देखील शेअर करत असतात.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका 28 जुलै 2008 मध्ये सुरू झाली होती. मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांची या मालिकेला पसंती मिळाली. मालिकेत सोढी ही भूमिका साकारणारा गुरु चरण सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच मालिका सोडली आहे.

तसेच सोनू भिडे ही भूमिका साकारणारी झील मेहता आणि टप्पू ही भूमिका साकारणारा भव्य गांधी यानेही मालिका सोडली आहे.

Team Beauty Of Maharashtra