‘तारक मेहता…’ मधील हा कलाकार सोडणार मालिका ?, आता दिसणार या प्रसिद्ध शोमध्ये

‘तारक मेहता…’ मधील हा कलाकार सोडणार मालिका ?, आता दिसणार या प्रसिद्ध शोमध्ये

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका गेल्या 13 ते 14 वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका या जबरदस्त अशा झाल्या आहेत. त्यामध्ये जेठालाल, चंपकलाल, नथू काका, तारक मेहता, बबीताजी, नायर, दयाबेन, टप्पू सेना यासह इतरांच्या भूमिका या प्रचंड गाजल्या आहेत.

आबालवृद्धांना पासून ही मालिका प्रेक्षकांची आवडती अशी आहे. या मालिकेमध्ये गोकुळधाम नावाची एक सोसायटी दाखवण्यात आलेली आहे. त्यामध्ये घडणाऱ्या घटना घडामोडी या प्रश्नवर आधारित ही मालिकाच असते. तसेच समाजामध्ये घडणार्‍या वाईट घटनांवर देखील ही मालिका नेहमी भाष्य करत असते. या मालिकेतून समाजासाठी चांगला संदेश जात असतो. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचे दिसत आहे.

या मालिकेत साधारण चार वर्षापूर्वी दयाबेन चे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानी यांनी ही मालिका सोडली होती. गरोदर पणाचे कारण देऊन त्यांनी ही मालिका सोडली. मात्र, खरे कारण काही वेगळेच होते. चार वर्षानंतरही त्यांनी ही मालिका पुन्हा रुजू केली नाही. त्यामुळे दिशा वकानी यांनी नेमकी मालिका का सोडली याचे कारण काही कळू शकले नाही. मध्यंतरी याबाबत व्हिडिओ व्हायरल झाला होता.

या व्हिडिओमध्ये दयाबेन या मालिकेतील सगळ्या कलाकारांसोबत दिसत होत्या. मात्र, त्या पुन्हा मालिकेत आल्या नाहीत. गेल्या वर्षी कोरोना महामारीचा उद्रेक देशातसह राज्यांमध्ये सुरू झाला. त्यानंतर सगळ्या क्षेत्रावर याचा प्रभाव पडला होता आणि त्यांना रोजगाराचे साधन देखील मिळत नव्हते. त्याचप्रमाणे मालिका कलाकारांवर देखील उपासमारीची वेळ आली होती.

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील कलाकार देखील कामाच्या शोधात होते. नटू काका ही भूमिका साकारणार्‍या अभिनेत्याकडे देखील काम नव्हते. त्यांनी याबाबत आपली कैफियत मांडली होती. मला काम भेटत नाही. त्यामुळे माझ्या खाण्याचे वांदे होत आहेत, असे त्यांनी म्हटले होते. तारक मेहता का उल्टा चश्मा मधील बागा ही भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडते.

या मालिकेमध्ये जेठालाल आणि बबिता अय्यर यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यांची बोलण्याची पद्धत सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. बबीता हे पात्र प्रेक्षकांच्या मनात चांगलेच घर करून बसलेले आहे. बबिता ही भूमिका मुनमुन दत्ता या अभिनेत्रीने साकारलेली आहे. त्यांचा निरागस लूक जेठालाल यांना खूप भावत असतो.

आता एक बातमी अशी आलेली आहे की, बबीताजी म्हणजेच मुनमुन दत्ता या तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडणार आहेत. आपल्याला ऐकून धक्का बसला असेल. मात्र, हे खरे आहे. मुनमुन दत्ता बिग बॉस मध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात येते. बिग बॉस मध्ये त्या आपल्या आयुष्यातील गमतीजमती देखील सांगणार असल्याचे कळते. तसेच त्यांचा स्वभाव कसा आहे आणि इतर कलागुण त्या यावेळेस सांगणार असल्याचे कळते.

त्यामुळे तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत आता बबीताजी दिसणार नाहीत. त्यामुळे आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेमध्ये बबीता जी यांच्या जागी कोण अभिनेत्री येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Team Beauty Of Maharashtra