Tarak Mehta मालिकेत आता ‘हा’ अभिनेता घेणार नट्टू काकांची जागा?

Tarak Mehta मालिकेत आता ‘हा’ अभिनेता घेणार नट्टू काकांची जागा?

तारक मेहता का उल्टा चष्मा ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील सर्वत्र कलाकारांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. या मालिकेतील नट्टू काकांची भूमिका साकारणारे घनश्याम नायक अगदी घराघरात पोहोचले ते याच मालिकेमुळे…

नुकतीच शोच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली. ती म्हणजे नट्टू काका यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते यांना कॅन्सरची लागण झाली आहे. त्यानंतर ते उपचार घेत होते. मात्र महिन्याभरापूर्वी त्यांचं निधन झालं. सगळेच नट्टू काकांना मिस करत आहेत. अशात आता अजून एक बातमी समोर आली आहे.

एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात नट्टू काका यांची भूमिका साकारणारा नवा कलाकार दिसून येत आहे. ज्यात एक ज्येष्ठ कलाकार नट्टू काकांच्या लूकमध्ये आणि ज्या ठिकाणी ते जेठालालच्या दुकानात बसलेले दिसायचे, त्या ठिकाणी हा नवा कलाकार बसलेला दिसत आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर या नव्या नट्टू काकांबद्दल चांगलीच चर्चा आहे. पण अद्याप मालिकेच्या टीमकडून कोणतीही ऑफिशियल घोषणा करण्यात आलेली नाही.. त्यामुळे ही बातमी योग्य आहे की नाही याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.

त्यामुळे नट्टू काकांची भूमिका कोण साकारणार याबाबत उत्सुकता कायम आहे.

Team Beauty Of Maharashtra