स्वामी समर्थ महाराज म्हणतात, सद्कर्माची कास कधीही सोडू नये; वाचा, प्रेरक बोधकथा

स्वामी समर्थ महाराज म्हणतात, सद्कर्माची कास कधीही सोडू नये; वाचा, प्रेरक बोधकथा

अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज म्हणजे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान. स्वामी समर्थांच्या सेवेत असलेल्या बऱ्याच सेवकांनी स्वामींच्या लीला केवळ जवळून पाहिल्या नाहीत, तर त्याची नोंदही करून ठेवली आहे. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश, बोध हे समाजासाठी नेहमीच लाभदायक ठरत असतात, याची प्रचिती आजही अनेकांना येत असल्याचे सांगितले जाते. एका प्रसंगात सद्कर्माची कास कधीही सोडू नये, असा बोध स्वामी करतात. नेमके काय घडले? जाणून घेऊया…

ठाकुरदास नावाचे एक प्रसिद्ध प्रबोधनकार होते. ते जेव्हा कीर्तन करायचे, तेव्हा लोकं साक्षात डोलायची. तो अनन्य दत्तभक्त होता. इतके असूनही ते दुःखी होते. कारण त्याच्या अंगावरील कोड. त्यांना फक्त हाच प्रश्न होता की, आयुष्यभर एवढी अनन्य भावांनी दत्त उपासना करून आपल्याला कोड का झाला? एक दिवस ते वैतागून निर्णय घेतात की, आता संसार सोडून काशीला जाऊन उर्वरित जीवन तिथेच काढावे. ते आपल्या परिवाराची व्यवस्था लाऊन काशीला जायची तयारी करतात. मात्र, त्यापूर्वी गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करावे, असा विचार ते करतात.

जायच्या आधी ते गावकऱ्यांच्या आग्रहाखातर दत्तप्रबोधन करतात. त्या रात्री साक्षात दत्तगुरु स्वप्नात येऊन आज्ञा करतात की, काशीला न जाता अक्कलकोटला जा. दत्त आज्ञा झाल्याने ते काशीला न जाता अक्कलकोटला जातात. स्वामी महाराज त्याला पाहताच म्हणतात की, हमारी कस्तुरी लाओ! ठाकुरदासना स्वामींचा अधिकार कळतो. स्वामी साक्षात दत्त अवतार आहे, अशी त्याला प्रचिती येते. ते स्वामी चरणी नतमस्तक होतो. ठाकुरदास स्वामींना म्हणतात की, जीवनभर दत्त उपासना करूनही मला कुष्ठरोग का झाला?

स्वामी महाराज म्हणतात की, हे तुझे भोग आहेत. वेळ आले की, ते संपतील. काही दिवसांनी स्वामी कृपेमुळे ठाकूरदास यांचा रोग बरा होतो. स्वामी बोध करतात की, कर्मामुळे विपरीत प्रारब्ध प्राप्त झाले, तरीही सद्कर्माची कास कधीही सोडू नये. उपासना पंथ सांडू नये. भोग आपली वेळ आली की, आपोआप संपणार. ठाकुरदास पुन्हा एकदा स्वामी चरणी नतमस्तक होतात

Team Beauty Of Maharashtra