सूर्याचे कन्या राशीतले परिवर्तन या राशींसाठी असणार आहे नुकसानकारक, करा हे उपाय

सूर्य कन्या राशीत करणार प्रवेश- ज्या दिवशी सूर्य देव राशी बदलतो, तो दिवस संक्रांती म्हणून ओळखला जातो. सप्टेंबर महिन्यात, सूर्यसंक्रांती १७ तारखेला आहे, या दिवशी सूर्य स्वत:च्या सिंह राशीतून बाहेर पडेल आणि कन्या राशीत जाईल. न्या राशीत सूर्याच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो याविषयी जाणून घेऊयात, त्यासोबतच आपण काय उपाय करायला हवेत तेही पाहूया…
मेष- सूर्य देव तुमच्या सहाव्या स्थानी संक्रांत करतील, वैदिक ज्योतिषशास्त्रात सहावे स्थान फार शुभ मानले जात नाही. या स्थानी सूर्याच्या संक्रमणामुळे तुमचे विरोधक सक्रिय होऊ शकतात आणि तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचू शकतात, त्यामुळे तुम्ही या वेळी सावध राहा. कामाच्या ठिकाणी तुम्ही राजकारणापासून दूरच राहावे. यावर उपाय म्हणून तुम्ही सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
मिथुन- सूर्य देवाचे संक्रमण तुमच्या चौथ्या स्थानी असेल, या काळात तुम्हाला कौटुंबिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. वाहन वगैरे चालवताना काळजी घ्या आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल तणावात असता तेव्हा अशा परिस्थितीत अजिबात गाडी चालवू नका. यावर उपाय म्हणून, मिथुन राशीच्या लोकांनी या वेळी वडिलांचा किंवा वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊनच घराबाहेर पडावे.
तूळ- तुमच्या बाराव्या स्थानी सूर्याच्या संक्रमणामुळे अकारण खर्चात वाढ होऊ शकते. यावेळी, तुम्ही हुशारीने पैसे खर्च केले पाहिजेत, घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेणे या काळात टाळावे. मात्र, परदेशांशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक संबंधीत अपेक्षीत फायदा होऊ शकतो. यावर उपाय म्हणून तूळ राशीच्या लोकांनी यावेळी केशरी रंगाचे कपडे घालावेत.
मकर- मकर राशीचे लोकांवर शनीचे स्वामीत्व असून, सूर्य राशीच्या आठव्या स्थानी संक्रमण करणार आहे. या संक्रमणादरम्यान तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकते, या काळात तुम्ही तळलेले आणि भाजलेले अन्न खाणे टाळावे, अन्यथा तुम्हाला पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. सूर्याचे वाईट परिणाम टाळण्यासाठी या काळात मकर राशीच्या लोकांनी रोज सकाळी ‘ऊॅं सूर्याय नमः’ मंत्राचा जप करावा.