सूर्य ग्रहणानंतर भाऊबीज, तब्बल 50 वर्षांनंतर जुळून येतोय हा अद्भुत योग

सूर्य ग्रहणानंतर भाऊबीज, तब्बल 50 वर्षांनंतर जुळून येतोय हा अद्भुत योग

26 आणि 27 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेचा सण साजरा केला जात आहे. ज्योतिषांच्या मते, यंदाचा भाऊबीजेचा (Bhaubij 2022) सण खूप खास असणार आहे. योगायोगाने 50 वर्षांनंतर सूर्यग्रहणाच्या दुसऱ्याच दिवशी भाऊबीजेचा सण साजरा केला जात आहे. ग्रहणाचा कुठलाही परिणाम या सणावर होणार नसल्याचे जोतिषतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भाऊबीजेला ग्रहांची हालचाल- ज्योतिषांचे म्हणणे आहे की भाऊबीजेच्या सणावर तीन प्रमुख ग्रह आपापल्या राशींमध्ये वास्तव्य करणार आहेत. प्रतिगामी बृहस्पति मीन राशीत आहे, शुक्र तूळ राशीत आहे आणि शनि मकर राशीत आहे. तीन मोठे ग्रह स्वतःच्या राशीत असल्यामुळे सणाचे महत्त्व आणखी वाढले आहे.

भाऊबीजेचा मुहूर्त- हिंदू दिनदर्शिकेनुसार, भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी कार्तिक शुक्ल द्वितीया तिथी बुधवार, 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 02:43 ते दुसऱ्या दिवशी, 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:45 पर्यंत असेल. अशा परिस्थितीत, आपण तारखेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कधीही उत्सव साजरा करू शकता.

अशी करा भाऊबीजेची तयारी- भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते. या दरम्यान पूजेमध्ये काही विशेष गोष्टी ठेवणे आवश्यक आहे. भाऊबीजेला भावाला ओवाळताना ताटात कुंकू , फुले, अक्षत, सुपारी, सोनं, तुपाचा दिवा, नारळ, मिठाई या गोष्टी अवश्य ठेवाव्यात. या सर्व गोष्टींशिवाय भाऊबीज हा सण अपूर्ण मानला जातो.

असा साजरा करा भाऊबीजेचा सण- सकाळी आंघोळ केल्यानंतर बाहिनेने भगवान विष्णू किंवा गणेशाची पूजा करावी. संध्याकाळी चंद्र निघाल्यावर आधी चंद्राला ओवाळावे त्यानंतर भावाला ओवाळावे. भावाला मिठाई भरवावी व भेटवस्तू द्यावी. भाऊ वयाने मोठा असेल तर त्याच्या पाया पडावे तसेच बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीच्या पाय पडावे. अशाप्रकारे हा पवित्र सण साजरा करावा.

Team Beauty Of Maharashtra