मराठीसह हिंदी मध्ये हिट गाणी देणारे सुरेश वाडकर यांची पत्नीही देखील आहे दिग्गज गायिका

सुरेश वाडकर हे असे एक नाव आहे की ज्यांची ओळख आज सातासमुद्रापार गेली आहे. सुरेश वाडकर हे दिग्गज असे गायक आहेत. वाडकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटातही अतिशय चांगल्याप्रकारे गाणे गाऊन अनेकांना मंत्रमुग्ध केलेले आहे. सुरेश वाडकर यांनी भक्तीगीत, भावगीत, ॲटम सॉंग याच्यासोबतच इतर गाणे देखील त्यांनी आपल्या वेगळ्या खुबीने गायलेली आहेत.
सुरेश वाडकर यांनी गायलेली साई बाबा वरील ‘ओम साई नमो नमः’ हे भावगीत तर एवढे लोकप्रिय झालेले आहे की ते ऐकताच अनेकांचे ओठ हलू लागतात. त्याचप्रमाणे वाडकर यांनी 80 90 च्या दशकामध्येही अनेक चित्रपटात लोकप्रिय गाणी दिली आहेत. यामध्ये आपल्याला सदमा या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
सदमा या चित्रपटातील त्यांचे ‘ये जिंदगी गले लगाले’ हे गीत आजही तेवढेच अजरामर आहे. त्याच प्रमाणे त्यांचे ‘तुमसे मिलके ऐसा लगा’ हे गीत ही तेवढेच लोकप्रिय ठरलेले आहे. 1998 99 च्या दरम्यान आलेल्या सत्या चित्रपटातील ‘सपने मे मिलती है कुडी सपने मे मिलती है’ हे गीत तर एवढे गाजले की, प्रत्येक लग्नाच्या वरातीमध्ये हे गीत वाजलेच म्हणून समजा.
त्यानंतर सुरेश वाडकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीला ही अनेक उत्कृष्ट असे गीत दिलेले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये टिव्ही चैनल चा बोलबाला खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे अनेक संगीत रजनी असलेल्या शोचे सूत्रसंचालन देखील त्यांनी केलेले आहे. सुरेश वाडकर यांचा शिष्यवर्ग देखील खुप मोठ्या प्रमाणात आता बनलेला आहे. सुरेश वाडकर यांच्या आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत.
लग्नाच्या आधी सुरेश वाडकर यांना माधुरी दीक्षित हिचे देखील स्थळ चालून आले होते, असे सांगण्यात येते. मात्र, त्यांनी मुलगी खूपच बारीक आहे, असे सांगून हे स्थळ नाकारले होते, अशाही बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. आम्ही आपल्याला सुरेश वाडकर यांच्या पत्नीबाबत माहिती देणार आहोत. सुरेश वाडकर यांनी 1888 मध्ये लग्न केलेल आहे.
सुरेश वाडकर यांच्या पत्नीचे नाव पद्मा असे आहे. त्यादेखील उत्कृष्ट गायिका आहेत. या दोघांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र गीत गायनाचे काम केलेले आहे. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो नुकतेच व्हायरल झालेले आहेत. या फोटोमध्ये दोघांचा लग्नाचा फोटो दाखवण्यात आलेला आहे. पद्मा वाडकर आणि सुरेश वाडकर यांनी पाठशाला हे गाणे एकत्र केले होते.
हे गाणे प्रचंड गाजले होते. त्यानंतर त्यांनी राजना साजना हे गीत देखील गायले होते. दोघांनी एकत्रित गायलेले त्यांचे हे पहिलेच गीत होते. या दोघांना दोन मुली आहेत. त्यादेखील आता मराठी चित्रपट सृष्टी व बॉलिवूडमध्ये करिअर करण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येते.