‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील लतिकाचा नवा चेहरा ? आता लतिका बदलणार तर नाही ना

गेल्या काही महिन्यापासून सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे. ही मालिका महाराष्ट्रातील प्रत्येक घरात सध्या पाहिल्या जाते. या मालिकेचा टीआरपी देखील जबरदस्त असल्यामुळे या मालिकेला प्राईम टाईम देण्यात आलेला आहे. या मालिकेमध्ये लतिका ही भूमिका अक्षया नाईक या अभिनेत्रीने साकारलेली आहे. अक्षया ही अतिशय जाडजूड अशी आहे.
एका जाड मुलीला कसे प्रॉब्लेम येतात, हे या मध्ये दाखवण्यात आलेले आहे. याआधी अक्षया बद्दल अनेकदा आपण ऐकलेले असेल. या मालिकेत ती एका बँकेत नोकरी करत असते. तिच्या वडिलांची भूमिका उमेश दामले यांनी साकारलेली आहे. तिचे हे बापू अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्याशी वागत असतात. उमेश दामले यांच्या पत्नी चित्रा दामले या देखील खऱ्या आयुष्यामध्ये बँकेत नोकरी करतात.
त्यामुळे लतिका आणि बापू यांच्यामध्ये मालिकेत चांगल्याप्रकारे ट्युनिंग जमत असल्याचे दिसत आहे.अक्षयाची बहीण अक्षता नाईक हीदेखील अभिनेत्री होती, हे फार कमी लोकांना माहीत आहे. अक्षया हिने काही वर्षांपूर्वी आलेल्या ज्ञानेश्वरी या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाची निर्मिती तिच्या वडिलांनीच केली होती. या चित्रपटामध्ये रमेश भाटकर, निशिगंधा वाड या कलाकारांच्या भूमिका दिसल्या होत्या.
त्या वेळेस छोट्या ज्ञानेश्व रीने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. मात्र, कालांतराने अक्षताने शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर लग्न केले. आता ती संसारामध्ये रममाण झालेली आहे, असे असले तरी ती आपली बहिण अक्षयाच्या सोबत सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडिया वर ती आपले व्हिडिओ देखील टाकत असते. त्यांच्या या व्हिडिओला प्रेक्षक देखील लाईक करत असतात.
एकूणच काय ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये लतिका हिची भूमिका प्रेक्षकांना सध्या प्रचंड आवडत आहे. तिच्या मधला कॉन्फिडन्स हा प्रेक्षकांना प्रचंड भावत आहे. आज आम्ही आपल्याला सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील लतिका बद्दल सांगणार आहोत. ही मालिका लतिका सोडणार का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, आम्ही आपल्याला याबाबत आज सांगणार आहोत.
लतिका म्हणजेच अक्षया नाईक सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका अजिबात सोडणार नाही, तर या मालिकेचा आता गुजराती रिमिक्स येणार आहे. होय गुजराती रिमिक्स मध्ये लतिका हे पात्र ध्वनी उपाध्याय ही अभिनेत्री साकारणार आहे. ध्वनी देखील लतिका सारखी दाखवण्यात आलेली आहे. गुजराती मालिकेचे नाव ‘मारो मन मोही गयु’ असे या मालिकेचे नाव आहे.
आपल्याला गुजराती मालिका पाहायला आवडेल का? आम्हाला नक्की सांगा.