‘सुंदरा मनामध्ये भरली’ मध्ये दिसलेली ही अभिनेत्री रस्त्यावर भीक का मागत आहे ? जाणून घ्या नेमकं काय घडलंय

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मध्ये दिसलेली ही अभिनेत्री रस्त्यावर भीक का मागत आहे ? जाणून घ्या नेमकं काय घडलंय

आपण अनेकदा रस्त्यावरून जात असताना सिग्नल लागला की, तिथे भिकारी हा हमखास पहिला असेल. भिकारी पैसे घेतल्या शिवाय समोर जात नाही, असा अनुभव अनेकांना आलेला असेल. मात्र, भिकारी भीक मागतो हा देखील संशोधनाचा विषय आहे. मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने भिकारी आहेत आणि त्यांचा टर्नओव्हर देखील लाखो रुपयात असल्याचे सांगण्यात येते.

भिकाऱ्यांच्या टोळ्या देखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते, असेही सांगण्यात येते. यामध्ये गुंडांचा समावेश देखील खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. मुंबईमध्ये स्थानिक महापालिका प्रशासनातर्फे कोंडवाडा राबवण्यात येतो आणि या भिकाऱ्यांना त्यात ठेवण्यात येते. हा ट्रक हा आला की भिकारी हे सैरावैरा पळत सुटतात.त्यांना लक्षात येते की, आता या ट्रकमध्ये आपल्याला घालून नेण्यात येणार आहे. त्यामुळे हे भिकारी अशी कृत्य करत असतात.

काही वर्षांपूर्वी मधुर भांडारकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाने याच विषयावर एक चित्रपट बनवला. या चित्रपटाचे नाव ‘ट्राफिक सिग्नल’ असे होते. या चित्रपटात कुणाल खेमू याने अतिशय दर्जेदार अशी भूमिका केली होती. या चित्रपटांमध्ये नीतू चंद्रा हिने भूमिका साकारली होती.त्याचप्रमाणे उपेंद्र लिमये, सुधीर मिश्रा यासारखे कलाकार देखील या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट प्रचंड चालला होता. आज आम्ही आपल्याला एका अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत.

या अभिनेत्रीने देखील रस्त्यावर भीक मागितली आहे. मात्र, ती कोणालाही ओळखू आली नाही. आपण सध्या छोट्या पडद्यावर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका पाहत असाल. या मालिकेमध्ये लतिका च्या बहिणीची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री रस्त्यावर भीक मागताना दिसली.या अभिनेत्रीचे नाव गौरी किरण असे आहे. गौरी किरण ही सध्या ब्लॅंकेट या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटामध्ये ती एका कचरा डेपो मध्ये राहणाऱ्या वेडसर आणि मानसिक संतुलन बिघडलेल्या मुलीची भूमिका साकारत आहे.

यासाठी तिने रस्त्यावर भीक मागण्याचा सीन देखील चित्रित केलेला आहे. गौरी किरण हिला यासाठी कचरा डेपोमध्ये तब्बल बारा दिवसापर्यंत राहावे लागले. कचरा डेपोमध्ये तिला झोपावे लागले आणि तसेच तिला तिथेच जेवण करावे लागले.यासाठी तिने देखील केस घान करून घेतले. आणि तिच्या नखांमध्ये मळ देखील खूप मोठ्या प्रमाणात झाला होता. युरिन इन्फेक्शन झालेले असताना देखील गौरी हिने आपले चित्रीकरण पूर्ण केल्याचे सांगण्यात येते.

काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड येथील एका सिग्नलवर भीक मागताना तिला पाहण्यात आले होते. मात्र, तिला कोणीही ओळखलं नाही, हे विशेष. हा एक सरावाचा भाग होता, असेही सांगण्यात आले.याआधी गौरी किरण हिने पुष्पक विमान या चित्रपटामध्ये काम केलेले आहे. हा चित्रपट त्यावेळेस प्रचंड चालला होता. त्याच प्रमाणे गौरी सध्या स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत देखील काम करताना दिसत आहे.

आपल्याला गौरी किरण ही आवडते का? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra