मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतील ‘सुमी’ येतेय पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, या मालिकेत दिसणार

मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतील ‘सुमी’ येतेय पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, या मालिकेत दिसणार

काही महिन्यांपूर्वी संपलेल्या मिसेस मुख्यमंत्री या मालिकेत एका अभिनेत्रिने सुमीचे पात्र साकारले होते. ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या मालिकेतील हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते. या अभिनेत्रीचे नाव अमृता धोंगडे असे होते. अमृता ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यांशी संवाद देखील साधत असते. तसेच आपले फोटो देखील ती शेअर करत असते. तिच्या फोटोला चाहते लाईक देखील करत असतात. काही महिन्यांपूर्वी तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर एका चाहत्याने प्रश्न देखील विचारला आहे.

या फोटोमध्ये तिच्यासोबत एक तरुण दिसत आहे. त्यावर एकाने तिला प्रश्न विचारला की, हा तुझा बॉयफ्रेंड आहे का? त्यावर तिने थेट उत्तर न देत असे सांगितले की, ‘आय लव यू अतुल’ नेहमी माझ्या सोबतच राहा. या अभिनेत्याचे नाव अतुल आगलावे असे आहे. हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकत्र डेट करत असल्याचे सांगण्यात येते.

दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, असेही बोलले जाते. अमृता ही इंस्टाग्राम वर खूप सक्रिय असते. याबाबत चा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अमृता हिने ‘चांदणे शिंपित जशी’ या मालिकेत देखील काम केले आहे. गेल्या काही वर्षात मराठी मालिकांमध्ये पौराणिक मालिका देखील मोठ्या प्रमाणात दाखवण्यात येत आहेत.

या पौराणिक मालिकांमध्ये अनेक कलाकार सहभागी होत असतात. काही वर्षांपूर्वी जय मल्हार ही मालिका आली होती. या मालिकेमध्ये देवदत्त नागे यांनी मल्हाराची भूमिका केली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर कृष्णावर आधारित मालिका देखील प्रचंड गाजल्या.

जुन्या काळामध्ये रामायण, महाभारत, हनुमान या मालिकादेखील प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. तसेच ऐतिहासिक मालिका देखील गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

आपण सर्वांनीच लहानपणी आजी किंवा आईकडून ‘एक आटपाट नगर होतं तिकडे एक साधुवाणी राहत होता’ या चातुर्मासाच्या गोष्टी ऐकल्या असतील. याच चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारुपात ‘घेतला वसा टाकू नको’ या कार्यक्रमातून पाहायला मिळतात.

आता अमृता धोंडगे, मिसेस मुख्यमंत्री या मालिकेनंतर एका मालिकेमध्ये सूर्यदेवाच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येते. ही मालिका लवकरच टेलिव्हिजनवर येणार आहे. शनि देवाची जन्म कथा, शनी देव महात्म्य याबाबत या मालिकेत विस्तृत दाखवण्यात आले असल्याचे सांगण्यात येते.

आता अमृता धोंडगे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्ये इतर कुठल्या भूमिका आहेत, याबाबत आत्ताच माहिती मिळाली नाही. मात्र, ही मालिका अतिशय वजनदार होणार असल्याचे सांगण्यात येते. तर आपल्याला अमृत धोंडगे आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra