‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधील मल्हारची खऱ्या आयुष्यातील ‘शालिनी’ दिसायला आहे खुपचं सुंदर !

स्टार प्रवाह या वाहिनीवरील “सुख म्हणजे नक्की काय असतं” ही मालिका सध्या इतर मालिकांपेक्षा वेगळे कथानक घेऊन काही भागांपासून आपल्या समोर येत आहे. या मालिकेमध्ये जयदीप आणि गौरी यांची जोडी दाखवण्यात आलेली आहे. ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.
गौरीची भूमिका अभिनेत्री गिरिजा प्रभू हिने साकारली आहे. या मालिकेची निर्मिती प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेमध्ये एक वादाचा प्रसंग घडला होता, त्यावर महेश कोठारे यांनी माफी मागितली होती. त्यानंतर मालिकेतील वाद शमला होता.
वर्षा उसगावकर देखील यांनी अनेक वर्षानंतर या मालिकेत पुनरागमन केले आहे. या मालिकेमध्ये वर्षा उसगावकर माई या भूमिकेत दिसत आहेत. शालिनी व मल्हार ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यांचा अभिनय हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
यात शालिनी ही शिर्के पाटील यांचे घर नावावर करून घेते व घरातील सर्व सदस्यांना त्रास देत आहे. ती मल्हारचे देखील ऐकत नाही. मल्हार ला ती सांगते की, जर तुझी आई माझ्या पाया पडून माफी मागेल तरच मी पुन्हा येईल, असे म्हणते. याचा मल्हार याला खूप राग येतो.
तो पुन्हा शालिनीला घरात आणण्याचा विचार करत नाही. शालिनी कट कारस्थान शिर्के पाटील यांचे घर नावावर करून घेते. येणाऱ्या काही भागांमध्ये आपण पाहणार आहोत की, या मालिकेत आता कबड्डीची मॅच होणार आहे. यासाठी भैरू म्हणजेच अभिनेते मिलिंद शिंदे काही भागात आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
जयदीपच्या टीमला मार्गदर्शक म्हणून भैरूच्या भूमिकेत येणार आहे. मल्हार आता शालिनी सोबत न राहता आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. त्याला शालिनी खूप आवडत असते. मल्हारचे शालिनी वर प्रेम असते. परंतु शालीनीच्या या वागण्यामुळे तो हैराण झालेला असतो.
हैराण झालेला मल्हार याच्या खऱ्या आयुष्यातील शालिनी म्हणजे त्याची पत्नी ही अतिशय सुंदर अशी आहे 2018 मध्ये त्यांनी लग्न केले आहे. त्याच्या पत्नीचे नाव रेणू होनराव असे आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील मल्हारी ही व्यक्तिरेखा अभिनेता कपिल होनराव याने साकारली आहे. कपिलचा जन्म 15 ऑगस्ट रोजी लातूरमध्ये झाला.
एका शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याने अभिनयाची सुरुवात थिएटर पासून केलेली आहे. अनेक नाटकांमधील त्याच्या भूमिकांचं त्याच्या कामाचं कौतुकही झालं. त्यानंतर सह्याद्री वाहिनीवरील “मर्म बंधातली ठेव “ही त्याची पहिली मालिका. विशेष ,लक्ष, प्रेमा रंग तुझा कसा या मालिकांमध्ये त्यांने काम केलं आहे.
खूप वेड आहे ,कर्म चक्र या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. कपिल याला त्याची पत्नीही पूर्ण पाठिंबा देते. त्यामुळे तो आपल्या पत्नीला देखील खूप मानतो, असे सांगण्यात येते.