स्त्री वेशातील या अभिनेत्याला ओळखलं का? ‘देवमाणूस’ मालिकेत साकारतोय महत्त्वाची भूमिका

देव माणूस ही मालिका पहिल्या भागामध्ये लोकप्रिय ठरली होती. मात्र आता दुसऱ्या भागांमध्ये प्रेक्षक मिळत नाहीत म्हणून या मालिकेची वेळ देखील बदलण्यात आली. मात्र असे असले तरी मालिकेतील कलाकार हे दमदार अभिनय करत आहेत. त्यामुळे मालिकेची चर्चा जोरात सुरू आहे.
पहिल्या भागात किरण गायकवाड याने देव माणूस मालिकेमध्ये डॉ. अजित कुमार देव ही भूमिका जबरदस्त साकारली होती. डॉक्टर अजित कुमार देव हा गावातील लोकांसाठी देव माणूस बनलेला असतो. ही कथा एका सत्य घटनेवर आधारीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एका गावामध्ये संतोष पोळ नावाच्या व्यक्तीने सहा लोकांना जिवंत गाडले होते. त्यावर आधारित ही मालिका बनवण्यात आली होती.
पहिल्या भागामध्ये बज्या, टोन्या नाम्या या भूमिका देखील लोकप्रिय ठरल्या होत्या. त्याच प्रमाणे या मालिकेमध्ये सर्वाच्या भूमिका देखील लोकप्रिय ठरल्या होत्या. दुसऱ्या भागात आता पाहिजे तसा प्रेक्षक वर्ग मालिकेला मिळत नाही. या मालिकेच्या कथानकावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी या मालिकेतील कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे.
या मालिकेमध्ये दुसऱ्या पर्वात एका भूमिकेभोवती मालिका फिरताना सध्या दिसत आहे. मालिकेत बज्या आणि नाम्या या मित्रांच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. नाम्याचा लूक देखील या दुसर्या भागामध्ये बदलण्यात आला आहे. नाम्या एका मॉलचा मालक दाखवण्यात आहे. मात्र, त्याचा हा मॉलाच बंद पडला आहे.
त्यामुळे तो एका पतसंस्थेचा मालक बनला आहे. त्यामुळे मालिकेत आता मोठे वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांची सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते. या मालिकेत काम करणारा नाम्या म्हणजेच अभिनेता निलेश गवारे हा नुकताच चर्चेत आला आहे.
कारण की सोशल मीडियावर त्याचा स्त्री वेशातील एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो व्हायरल झाल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. सध्या मालिकेमध्ये सोनाली नावाच्या एका पात्राची एन्ट्री झाली आहे. किशोरवयीन मुलगी डॉक्टरांकडे तिच्या जमिनीचा वाद सोडवण्यासाठी गेली आहे.
त्यामुळे डॉक्टर आता तिला काय मार्गदर्शन करणार हे आपल्याला लवकरच कळणार आहे.