सोमवती अमावस्येला या चुका मुळीच करू नका,जाणून घेऊया व्रताचे नियम आणि इतर मान्यता

अमावस्या तिथी प्रत्येक महिन्यात येते पण यापैकी काही अमावस्या तिथींना विशेष महत्त्व आहे. यातील सोमवार, मंगळवार आणि शनिवारची अमावास्या विशेष असते. या वर्षी २०२२ मध्ये २ दिवस अमावस्या साजरी होणार आहे. ३१ जानेवारी रोजी सोमवती अमावस्या तिथी दुपारी २:१९ वाजता सुरू होत आहे.
शास्त्रानुसार अमावस्या तिथी सोमवारी सूर्यास्तापूर्वी सुरू झाली असेल तर तिला सोमवती अमावस्या म्हणतात. ही अमावस्या शुभ मानली जाते. त्यामुळे या अमावास्येला भगवान शिवपार्वतींसोबत वटवृक्षाची पूजा केली जाते. याशिवाय या अमावास्येला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे शंकराची विशेष कृपा प्राप्त होते.
उशी वापरू नका
सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास करणाऱ्यांनी या दिवशी उशीचा वापर करू नये असा नियम आहे. कारण त्यात कापूस वापरला आहे. म्हणजेच सोमवती अमावस्येला कापसाला हात लावू नये, असे सांगितले जाते.
सुई धागा वापरू नका- सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवणकाम करू नये आणि सुया वापरणे टाळावे. मान्यतेनुसार या व्रताला सुई वापरण्यास मनाई आहे.
पलंगावर झोपू नका- सोमवती अमावस्येच्या दिवशी सात्विक भावनेने संयम ठेवावा. या दिवशी पलंगावर आणि गादीवर झोपू नये. जमिनीवर घोंगडी टाकून झोपलेले चांगले. मनात सर्वांबद्दल अपार प्रेम, भूतदया, सतत इतरांना मदतीची भावना, सर्वांविषयी कळवळा , यथायोग्य आहार ,यथायोग्य विहार,निस्वार्थता,निरपेक्षता, भगवद्भक्तीमध्ये आवड,मनोभावे भक्ती ,सदगुरू वचनावर विश्वास ठेवल्यास यथायोग्य लाभ मिळू शकतात.
मीठ सेवन करू नका- सोमवती अमावस्येच्या दिवशी जेवणात मीठ वापरू नये. जेवणात फळे आणि गोड पदार्थांचा समावेश केल्यास उत्तम होईल. माघ महिन्यात माघ शुक्ल सप्तमीला मिठाचा त्याग करणे अत्यंत लाभदायक मानले जाते, याला रथ सप्तमी असेही म्हणतात. म्हणुन या दिवशी मिठाचा त्याग करणे लाभदायक मानले जाते. त्यामुळे वर्षभराच्या रविवारचे पुण्य पदरी पडते, तसेच तुमच्या आयुष्यावर सूर्याचा शुभ प्रभाव देखील पडतो.