‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेतील ‘महत्वाच्या’ अभिनेत्रीने सोडली मालिका..

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेतील ‘महत्वाच्या’ अभिनेत्रीने सोडली मालिका..

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेमध्ये सध्या रंजक घटना घडामोडी घडताना दिसत आहेत. आता या मालिकेतून एक बातमी समोर आली आहे. ही बातमी म्हणजे एका दिग्गज अभिनेत्री ही मालिका सोडली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या मालिकेला नवीन वळण मिळणार आहे.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेमध्ये गुळपोळी गावातील देशमुख कुटुंबामध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे. या कुटुंबांमध्ये चार पिढ्या एकत्र नांदत असतात. आता या कुटुंबामध्ये शहरात वाढलेली आदिती सिद्धार्थची बायको म्हणून देशमुख कुटुंबीयांची सून म्हणून घरात येते.

एवढ्या मोठ्या कुटुंबात आल्यावर ती अतिशय घाबरून जाते. विशेष म्हणजे आधी तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झालेला असतो. त्यामुळे ती अतिशय दडलेली असते. घरातील परंपरा चालीरीती शिकवण्यात म्हणजे तिच्या सासूचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे ही मालिका आता जबरदस्त वळणावर आलेली आहे.

या मालिकेमध्ये आपल्याला बऱ्याच दिवसानंतर अभिनेता हार्दिक जोशी हा दिसला आहे. मालिकेचे कथानक सध्या वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेले आहे. मालिकेचा नायक असलेला सिद्धार्थ हा अमेरिकेला जाण्यासाठी धडपड करत आहे. आता तो अमेरिकेत जात असल्याने याबाबत आदिती ही मोठ्या बाईला याबाबत माहिती देते.

त्यामुळे मोठ्या आईला जबरदस्त धक्का बसतो आणि त्या चक्कर येऊन खाली कोसळतात .याचा सगळा दोष सिद्धार्थ आणि आदितीला देशमुख कुटुंबीय देतात. त्यामुळे आता या मालिकेत पुढे काय घडणार हे फार मजेशीर ठरणार आहे. सिद्धार्थाला अमेरिकेला जायचे आहे, याची सगळी माहिती मोठ्या बाईंना दिल्याचे आधीची सिद्धार्थ एका भागामध्ये सांगते.

त्यामुळे सिद्धार्थ हा तिला भावनिकरीत्या गुंतवून ठेवतो, असे देखील या मालिकेत आता दिसणार आहे. आदिती समोर तो वाईट बोलण्यासाठी दोन पर्याय ठेवतो. त्यामुळे आदिती ही घरातल्या सगळ्यांना सांगते की, अमेरिकेला जाण्याचा निर्णय माझा आहे. मात्र, खर्‍या अर्थाने सिद्धार्थ अमेरिकेला जायचे असते.

त्यामुळे आधी तीही घरच्यांसोबत वाईटपणा घेते. घरामध्ये असताना ती पाश्‍चात्त्य संस्कृतीचे कपडे घालून सिद्धार्थसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी बाहेर जात असल्याने देशमुख कुटुंबियांना सांगते. प्रत्यक्षात ती मोठ्या बाईला बरे वाटावे म्हणून देवीच्या देवळात जात असते. हे घरातल्या लपवून ती करत असते. मालकीच्या आगामी भागांमध्ये आपण वेगवेगळे रंग या मालिकेत पाहणार आहोत.

तसेच पुढच्या भागात काही भागातील ती घरामध्ये ड्रिंक घेऊन तमाशा करते, असे देखील यामध्ये आता दिसणार आहे. खरं तर आदितीचा सिद्धार्थ त्याला अद्दल घडवण्याचा हेतू आहे, हे देखील समोर येणार आहे. अमेरिकेला जाण्यासाठी सिद्धार्थ तिला राजी करतो का? तिच्यावरील देशमुख कुटुंबाचा असलेला रोष कमी करते ? आपल्याला आगामी काही भागांमध्ये कळणार आहे.

तर आता या मालिकेमध्ये मोठ्या बाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंजली जोशी यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते. याबाबत सोशल मीडियावर माहिती समोर आली आहे. अंजली जोशी यांनी नेमक्या कुठल्या कारणाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे, हे मात्र अजून काही कळले नाही‌. मात्र, लवकरच या मालिकेतून त्या एक्झिट घेणार असल्याचे कळते.

Team Beauty Of Maharashtra