शुक्रदेव शनीच्या ‘या’ ४ राशींना बक्कळ धनलाभाची संधी देणार; तीन महिन्यात प्रेमाचा माणूस आयुष्यात येणार?

शुक्रदेव शनीच्या ‘या’ ४ राशींना बक्कळ धनलाभाची संधी देणार; तीन महिन्यात प्रेमाचा माणूस आयुष्यात येणार?

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा धन, समृद्धी, आनंदासह प्रेमळ ग्रह म्हणून ओळखला जातो. जेव्हा शुक्राचा अन्य राशीत प्रवेश होतो तेव्हा त्या व प्रभावित अन्य राशीच्या विवाह व प्रेमसंबंधांवर सुद्धा प्रभाव पडू शकतो. ९ दिवसांपूर्वी म्हणजेच १५ फेब्रुवारीला शुक्राने मीन राशीत प्रवेश घेतला आहे. यामुळे इथून पुढील काही महिने प्रभावित राशीच्या भाग्यात धनलाभासह प्रेमाची चाहूल सुद्धा लागू शकते. विवाहित मंडळींना जोडीदारासह रोमान्स अनुभवण्यासाठी येणारा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकतो. तर प्रभावित राशींना आपल्या जोडीदाराच्या रूपात आर्थिक लाभाचे सुद्धा संकेत आहेत. आता मुळात या प्रभावित राशी कोणत्या असणार हे पाहुयात..

शुक्र गोचराने ‘या’ ४ राशींना लाभेल प्रेमाची साथ?
मीन (Pisces Zodiac)
मीन राशीतच शुक्राचा प्रवेश झाला असल्याने सर्वात मोठा सुवर्णकाळ हा मीन राशीच्या मंडळींना अनुभवता येणार आहे. येत्या काळात तुम्हाला स्वतःसह नाते सुधारण्याची सुद्धा संधी लाभेल. तुमचा स्वभाव व व्यक्तिमत्व बदलू लागेल. व वाणीमध्ये माधुर्य येऊ शकते. तुमच्या बोलण्याने लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. आरोग्यात सुद्धा सुधारणा होऊ शकते. शुक्रवार तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो. तुम्हाला जोडीदारासह एखादा नवा व्यवसाय सुद्धा सुरु करता येईल.

मकर (Capricorn Zodiac)
मकर राशीच्या मंडळींसाठी शुक्राचे मीन राशीतील परिवर्तन अत्यंत अनुकूल सिद्ध होऊ शकते. तुम्हाला मित्रांचा सहवास लाभू शकते. आपल्याला मित्रांसह वेळ घालवल्याने मानसिक ताणतणावातून दूर राहता येईल. तुम्हाला एखाद्याजवळच्या प्रवासाची सुद्धा संधी आहे. नातेवाईकांशी भेट घ्यावी लागेल. तुमच्या जोडीदाराकडून एखादे मोठे सरप्राईज मिळू शकते. हे सरप्राईज तुमच्या आर्थिक आकडेवारीत मोठे बदल घडवू शकते. याशिवाय तुम्हाला कौटुंबिक सुख सुद्धा प्राप्त होऊ शकते.

कुंभ (Aquarius Zodiac)
कुंभ राशीच्या मंडळींसाठी शुक्राचे गोचर सकारात्मक प्रभाव घेऊन येऊ शकते. तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने जेवणातून आनंद अनुभवता येऊ शकतो. तुम्ही ज्या गोष्टीची टाळाटाळ करत असाल तीच पूर्ण केल्याने तुम्हाला मानसिक सुख अनुभवता येऊ शकते. नव्या लोकांना भेटण्याची संधी लाभू शकते. जीवनात कौटुंबिक सुखाचा गोडवा वाढेल. तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

वृश्चिक (Scorpio Zodiac)
वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी शुक्र सर्वात शुभ प्रभाव घेऊन येऊ शकतो. प्रेम संबंध दृढ होऊ शकतात. तुम्हाला शिक्षण किंवा परदेशवारीचा योग आहे. तुमच्या मेहनतीचे गोड फळ लवकरच पदरात पडणार आहे. तुम्ही कष्टाने जपलेली नाती तुमच्या चांगुलपणाने प्रभावित होऊन आणखीन जवळ येऊ शकतात. शुक्रवार व शनिवार तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतो.

Team BM