शुक्राचा उच्च राशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींना अच्छे दिन, धन-समृद्धी योग; भाग्योदयाचा उत्तम काळ!

शुक्राचा उच्च राशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींना अच्छे दिन, धन-समृद्धी योग; भाग्योदयाचा उत्तम काळ!

फेब्रुवारी महिन्यात नवग्रहांचा राजकुमार बुध, नवग्रहांचा राजा सूर्य यांच्या राशीपरिवर्तनानंतर शुक्र ग्रह रासबदल करणार आहे. सूर्याच्या कुंभ राशीतील प्रवेशानंतर लगेचच शुक्र गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी शुक्र कुंभ राशीतून मीन राशीत विराजमान होणार आहे.

मीन ही शुक्राची उच्च रास मानली जाते. म्हणजेच या राशीत शुक्र सर्वोत्तम फले देऊ शकतो, असे म्हटले जाते. शुक्र हा रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला जातो.

अशा स्थितीत १५ फेब्रुवारीपासून मीन राशीत प्रवेश केल्यानंतर शुक्र वृषभ राशीसह ५ राशींसाठी लाभ आणि प्रगतीचे योग तयार करेल, ज्यामध्ये मीन राशीत विराजमान असलेला गुरु ग्रह उपयुक्त ठरेल. शुक्राच्या मीन राशीत प्रवेशाचा कोणत्या राशींना फायदा मिळू शकेल, ते जाणून घेऊया…

वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्रचा उच्च राशीतील प्रवेश लाभदायक ठरू शकेल. उत्पन्न खूप चांगले होणार आहे. सर्व मनोकामना पूर्ण होतील. ज्या कामांमध्ये अडथळे येत होते ते आता हळूहळू पूर्ण होतील. या काळात नवीन वाहन खरेदी करू शकता. लव्ह लाईफ खूप रोमँटिक असू शकेल. नोकरदारांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.

कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्रचा उच्च राशीतील प्रवेश आनंददायी ठरू शकेल. नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. समस्यांपासून दिलासा मिळू शकेल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना त्यात यश मिळू शकते. मित्रांसोबत खूप चांगला वेळ घालवू शकाल. मन प्रसन्न आणि आनंदी राहू शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्रचा उच्च राशीतील प्रवेश चांगला ठरू शकेल. भरपूर पैसे मिळतील. अचानक धनलाभ होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे चांगले परिणामही तुम्हाला मिळतील. व्यापारी वर्गासाठी हा काळ खूप फायदेशीर ठरेल. व्यवसायात प्रगती होईल.

कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्राचा उच्च राशीतील प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. जोडीदारासोबतचे संबंध खूप चांगले राहतील. कामाच्या दृष्टीनेही हा काळ चांगला असेल. व्यवसायात खूप वाढ होऊ शकेल. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मीन राशीत शुक्राचा प्रवेश होत आहे. मीन ही शुक्राची उच्च रास मानली जाते. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जोडीदाराशी असलेले नाते दृढ होऊ शकेल. व्यापारी वर्गाने आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार केला तर त्यांना त्यात यश मिळू शकते. शुक्र ग्रहाने मीन राशीत प्रवेश करण्यापूर्वी कुंभ राशीत सूर्य, शुक्र आणि शनी यांचा त्रिग्रही योग जुळून येत आहे. हा शुभ योगांमधील एक मानला जातो.

Team BM