शुक्राचा मिथुन राशीत प्रवेश, या एका उपायाने होईल सर्व नकारात्मकता दूर

शुक्राचा मिथुन राशीत प्रवेश, या एका उपायाने होईल सर्व नकारात्मकता दूर

हिंदू ज्योतिषशास्त्रात (Astrology), शुक्र हा नऊ ग्रहांपैकी एक प्रमुख ग्रह मानला जातो, ज्याचा मानवी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र प्रेम, सौंदर्य, विलास, कला आणि सर्जनशीलता यांच्याशी संबंधित आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जेव्हा शुक्र कमजोर असतो किंवा प्रतिकूल स्थितीत असतो तेव्हा त्यामुळे नातेसंबंध, आरोग्य आणि वित्त विषयक विविध समस्या उद्भवू शकतात. हिंदू ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी कपाळावर टिळक लावण्याशी संबंधित काही उपायांचे तपशीलवार वर्णन केले आहे.

कपाळाला लावा टिळा
शुक्र देवाला प्रसन्न करण्यासाठी चंदन पावडर, हळद आणि केशर यांचा लेप वापरावा. लेप तयार केल्यानंतर अनामिकेच्या साहाय्याने कपाळावर दोन भुवयांच्या मध्ये टिळा लावावा.

नकारात्मकता होते दूर
ज्योतिष शास्त्राचा असा विश्वास आहे की असा टिळा कपाळावर लावल्याने शुक्राच्या नकारात्मक प्रभावांना शांत करण्यात मदत होते आणि प्रेम, नातेसंबंध, वित्त आणि सर्जनशीलता संबंधित सकारात्मक परिणाम मिळू शकतात. टिळा लावणे हिंदू धर्मात भक्तीचे प्रतीक देखील मानले जाते.

मीन राशीवर शुक्र संक्रमणाचा प्रभाव
मीन राशीच्या लोकांसाठी शुक्र तिसऱ्या आणि आठव्या घराचा स्वामी आहे. यामुळे जीवनात अनावश्यक समस्या निर्माण होऊ शकतात. नवीन कार खरेदी करू शकता. धनलाभ होईल. सासरच्या मंडळींकडून सहकार्य मिळेल. नोकरीत तुमची स्थिती अनुकूल राहील. शुक्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी पांढरी मिठाई दान करणे लाभदायक ठरेल.

वृश्चिक राशीच्या लोकांवर होणार हा प्रभाव
वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात नवीन नोकरीच्या संधी येतील. नोकरीत पगारवाढ होईल. वैवाहिक जीवनातील कटूता दूर होईल. घरात आनंदाचे वातावरण राहिल. ईच्छुकांचे विवाहयोग जुळून येतील. घर किंवा गाडी घेण्याचे स्वप्न पुर्ण होईल. जुने येणे वसुल होईल. व्यावसाय वाढीसाठी राबवलेल्या संकल्पना काम करतील.

Team BM