२०२३ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग; ‘या’ राशींना होणार धनलाभ? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा

२०२३ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग; ‘या’ राशींना होणार धनलाभ? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा

हिंदू पंचांग नुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला प्रभू श्रीरामाचा जन्म झाल्याचे मानले जाते. हिंदू धर्मात रामनवमी सणाला विशेष महत्त्व आहे. यंदा २२ मार्चपासून चैत्र महिन्याची सुरुवात होत आहे. यानुसार ३० मार्चला रामनवमी साजरी होणार आहे.

पौराणिक मान्यतेनुसार श्रीरामाचा जन्म त्रेतायुगात झाला तेव्हा चैत्र शुक्ल नवमीला पुनर्वसु नक्षत्रात कर्क राशीचा उदय झाला आणि मंगळ, शुक्र, सूर्य, शनि आणि गुरु हे पाच ग्रह उच्च स्थानात होते आले. यंदा शेकडो वर्षांनी रामनवमीच्या निमित्ताने अनेक शुभ योग सुद्धा जुळून आले आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार येत्या रामनवमीला काही राशींच्या भाग्योदयाचे संकेत आहेत. या राशींना नेमका कसा लाभ होणार हे ही जाणून घेउया…

रामनवमीला जुळून आले खास पवित्र योग (Ram Navami 2023)
ज्योतिषशास्त्रानुसार राम नवमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी व अमृत सिद्ध योग जुळून आला आहे. यंदा पहिल्यांदाचा या दोन्ही योगांची तिथी गुरु पुष्य योग काळात जुळून येणार आहे. ३० मार्चला सकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी या दोन्ही योगांची तिथी सुरु होईल तर रात्री १० वाजून ५९ मिनिटांपर्यंत शुभ काळ कायम असणार आहेत.

राम नवमी ‘या’ राशींना देणार प्रचंड लाभ?
सिंह (Leo Zodiac)
चैत्र नवरात्रीपासून ते राम नवमी पर्यंत सिंह राशीच्या कुंडलीत केवळ आनंदच आनंद लिहिलेला दिसत आहे. श्री रामाच्या कृपेने सिंह राशीच्या भाग्यात यशाची नांदी होऊ शकते. आपल्याला कर्जातून मुक्ती मिळू शकते. इतकेच नाही तर आर्थिक मिळकतीचे नवे स्रोत सुद्धा उघडू शकतात. तुम्हाला व्यवसायातून प्रचंड लाभाची संधी आहे.

वृषभ (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या मंडळींसाठी चैत्र रामनवमीचा दिवस अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. नव्या कामाच्या सुरुवातीला हा काळ शुभ ठरू शकतो. जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर वेळीच आणि सावनधपणे पाऊल उचलायला हवं. तुमच्या वाणीमुळे तुमचे आर्थिक ग्रह पालटण्याची शक्यता आहे.

तूळ (Libra Zodiac)
तूळ राशीच्या मंडळींसाठी यंदाची रामनवमी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते. तुम्हाला कुटुंबासह मोलाचे काही खास क्षण अनुभवता येईल. अविवाहित व लग्नासाठी उत्सुक मंडळींना मनपसंत स्थळ सांगून येऊ शकते. तुमच्या समाजातील प्रतिष्ठेत भर पडेल. आर्थिक फायद्यासाठी अत्यंत मोठी संधी येईल पण निर्णय अगदी काटेकोरपणे घेणे गरजेचे आहे.

Team BM