या श्रावण महिन्यातील पंचमी षष्ठी आहे खूप खास, हे सण उत्सव आलेत एकाच दिवशी.. जाणून घ्या सविस्तर

श्रावण पंचमी षष्ठीला सण उत्सवांचा योग जुळूण आला असून, आज शुक्रवारी १३ ऑगस्टला एकाच दिवशी नागपंचमी, कल्की जयंती, जरा जिवंतीका पूजन, अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी, महालक्ष्मी स्थानपूजन, सुपोदनवर्ण षष्ठी, आचार्य अत्रे जयंती हे सण उत्सव साजरे केले जातील. जाणून घेऊया थोडक्यात महत्व…
चातुर्मासात व्रत वैकल्यांचा काळ सुरू होतो तर श्रावण हा सणांचा राजा म्हटला जातो. श्रावण हा असंख्य व्रत वैकल्ये, विधी-उपचार आणि रुढींना परंपरेच्या सोनसळी भरजरी शेल्यात विणून टाकतो. ही व्रते म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्ष साधनेचे मार्ग नाहीत. अतिशय तरलपणे काहीतरी शिकवण देणारी किंवा एकमेकांतील नाते संबंध जपणारी ही व्रतांची एक पुण्याई म्हणावी लागेल.
या वर्षी श्रावण पंचमी षष्ठीला सण उत्सवांचा योग जुळूण आला असून, उद्या शुक्रवारी १३ ऑगस्टला एकाच दिवशी नागपंचमी, कल्की जयंती, जरा जिवंतीका पूजन, अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी, महालक्ष्मी स्थानपूजन, सुपोदनवर्ण षष्ठी, आचार्य अत्रे जयंती हे सण उत्सव साजरे केले जातील. जाणून घेऊया थोडक्यात महत्व…
जरा जिवंतीका पूजन- शुक्रवारी १३ ऑगस्टला जरा जिवंतीका पूजन होईल. महाराष्ट्रात जिवतीची पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. त्यासाठी आजूबाजूला बरीच लहान मुले असलेला जिवंतिका म्हणजे जिवतीचे चित्र भिंतीवर लावले जाते अथवा गंधाने काढले जाते. असे चित्र काढून मग तिची पूजा करावी. ह्या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे.
ह्मा तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. मग पूजेला बोलाविलेल्या स्त्रियांना हळदकुंकू देऊन जेवू घालावे. कथा अशी की, जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली.
नागपंचमी- श्रावण महिन्यातील पंचमी तिथीला नागपंचमी असते. त्यानुसार शुक्रवारी १३ ऑगस्टला नागपंचमी साजरी केली जाईल. साप नाग यांची प्रत्येकाला भिती वाटत असली तरी पौराणीक कथा मान्यतेनुसार नागांच्या पूजनाला देवतांच्या समान महत्व प्राप्त झालं आहे. याामुळे नागपंचमी साजरी करण्यासाठी पंचमी तिथी समर्पित करण्यात आली आहे. भारतात अनेक नाग देवतांची मंदिरे आहे. श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय असल्यामुळे नागपंचमीला अधीक महत्व दिले जाते. असे म्हणतात की नागपंचमीला नागाची पूजा केल्यास नाग साप या संबंधी असलेली भिती दूर होते.
कल्की जयंती- शुक्रवार १३ ऑगस्टला कल्की जयंती साजरी केली जाईल. कल्की जयंती श्रावण महिन्यातील षष्ठी तिथीला साजरी केली जाते. १३ ऑगस्ट ला पंचमी आणि षष्ठी दोघं तिथी असल्याकारणाने याच दिवशी कल्की जयंती देखील साजरी करण्यात येईल. हिंदू धर्माच्या पौराणिक मान्यतेनुसार कल्कीला विष्णूचा अवतार देखील मानण्यात येतो. पौराणिक कथेनुसार कलियुगात पापाची सीमा पार होण्यासाठी जगात दुष्टांचा संहार करण्यासाठी, कल्कीचा अवतार असेल, आणि धर्म ग्रंथानुसार कलियुगात भगवान विष्णू कल्कीच्या रूपात अवतार घेतील.
कल्की अवतार कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात होईल, पौराणिक मान्यतांनुसार कल्की ६४ कलांनी युक्त असेल. कल्की देवदत्त नावाच्या घोड्यावर स्वार होऊन जगातील पापी लोकांचा नाश करणार आहे, आणि धर्माची पुन:स्थापना करणार आहे. पुराणात असं म्हटलंय की, भगवान विष्णु एकूण २४ अवतार धारण करणार आहेत, त्यातील २३ अवतार धारण करून झाले आहेत. कल्की हा २४ वा अवतार असेल.
अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी- अहिल्यादेवींचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चौडी या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे या चौडी गावचे पाटील होते. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचे फार महत्त्व नव्हते. तरीही मानकोजी शिंदे यांनी अहिल्यादेवी यांना लिहायला वाचायला शिकविले. अहल्यादेवी यांनी अनेक ठिकाणी तलाव, मंदिर बांधले. जीर्णोद्धार केला. त्या मंदिराच्या आश्रयदाता होत्या.
द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ येथे तीर्थक्षेत्रांचे, धर्मशाळांचे बांधकाम त्यांनी केले. नर्मदा नदीवर इंदूरच्या दक्षिणेस, महेश्वर येथे राजधानी वसविली. मल्हाररावांनी त्यांना तलवारबाजी, युद्ध, प्रशासकीय आणि सैन्याच्या कामात पारंगत केले होते. अहल्यादेवींनी १७६६ ते १७९५ या काळात माळव्यावर राज्य केले. वयाच्या ७०व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अशा अहिल्याबाईंची देखील शुक्रवारी १३ ऑगस्टला पुण्यतिथी आहे.