जर तुम्हाला दोषमुक्त व्हायचे असेल तर श्रावणात करा हे उपाय करा… होताल दोषमुक्त, मिळेल फायदा

जर तुम्हाला दोषमुक्त व्हायचे असेल तर श्रावणात करा हे उपाय करा… होताल दोषमुक्त, मिळेल फायदा

नाविन्याची चाहूल म्हणजे श्रावण. श्रावणात आपल्या संस्कृती, परंपरा, सण-उत्सव यांची अगदी रेलचेल असते. वातावरणात थंडावा आलेला असतो. जिथे पाहावे, तिथे धरणी माता नवचैतन्याने न्हाऊन निघत असते. नदी, नाले, तलाव दुथडी भरून वाहत असतात. पाण्याची अल्लड धाव मनमोहून टाकणारी असते. प्राणी, पक्षी अवनीच्या या नवरुपामुळे आनंदी झालेले असतात.

पावसाच्या शिडकाव्यामुळे हिरवाईची चादर पसरलेली असते. यांसारखी अनेक वैशिष्ट्ये श्रावणाची सांगता येतील. याशिवाय महादेव शिवशंकरालाही हा महिना अत्यंत प्रिय असल्याचे सांगितले जाते. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात श्रावण सुरु होत आहे. अशात श्रावणात कोण कोणत्या सेवा कराव्या, कोणत्या उपायांनी विशेष लाभ मिळेल चला जाणून घ्या…

संकष्टी चतुर्थीला व्रताचा प्रारंभ करावा.- प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहिली पाहिजे. श्रावण महिन्यात श्री नवनाथ भक्तीसार, सुलभ भागवत,श्री गुरुचरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र या ग्रंथाचे पारायण करावे. श्रावण मासातील सोमवारी भगवान शंकराची मनोभावे पूजा करावी, बेल तसेच शंकरांना प्रिय अशा वस्तू त्यांना अर्पण कराव्या आणि दान धर्म करावे.

केवळ पाणी अर्पण केल्याने दोषातून मुक्तता- शनिदोषापासून मुक्तता होते. या महिन्यात शिवपूजा केल्याने अविवाहित लोकांनाच इच्छित जीवनसाथी प्राप्त होतो तसेच या महिन्यात सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात. केवळ पाणी अर्पण करून आपण आपल्या कुंडली मधील अनेक दोष दूर करू शकतात. पितृ दोष निवरण्यासाठीही हा महिना खूप महत्वाचा आहे. शिवलिंगावर केवळ जल अर्पण केल्यास पितृ दोष आणि याशिवाय काळ सर्प दोष यातुन सुटका होते.

काळ सर्प आणि पितृ दोष असा करावा दूर- या महिन्यात, काळ सर्प दोष कायद्याने सोडवून अधिक फायदा होतो. त्याचबरोबर या महिन्यात केल्या गेलेल्या छोट्या उपायाने पितृ दोषातून मुक्तता होते. शनिदोष किंवा पितृदोष ग्रस्त असलेल्या व्यक्तीने श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगाला पाणी अर्पण करावे, असे केल्याने महादेव आपल्या भक्तांच्या अशुभ प्रभाव दूर करतात. शिवलिंगाला पाणी अर्पण करतांना रुद्राष्टक स्तोत्रांचे पठण करावे. श्रावण महिन्यात व्रत वैकल्य करावे आणि मांसाहार पूर्णपणे टाळावा.

श्रावणातील वारांचे महत्व- सोमवार- श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात.

मंगळवार-नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर, नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात. त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देतात.

बुधवार- बुधाची पूजा. या श्रावणात बुधाचे दोन वेळा राशी परिवर्तन होणार आहे, पहिले ९ ऑगस्ट ला आणि दुसरे २६ ऑगस्ट या दिवशी. गुरुवार- बृहस्पती पूजा

शुक्रवार – जिवती देवीचे पूजन, पुरणाच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळणे आणि हळदी-कुंकू करण्याचीही प्रथा आहे.

शनिवार- ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन

रविवार- आदित्य राणूबाई पूजन आणि सूर्यदेवांचे पूजन.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra